पालखी पुण्यातून जाते तेव्हा पुण्यात भक्तीभावाचे वातावरण दिसून येते. पुण्यातील नागरिक रस्त्यांवर रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरुन वारीचे स्वागत करतात. ठिकठिकाणी फराळ वाटप केले जाते. या दिवसांमध्ये वारीतील लोक कडक उपवास
पाळतात. वारीच्या अशा धार्मिक वातावरणाला गालबोल लावणारी घटना पुण्यातील
कॅम्प परिसरात घडली आहे. पुण्याच्या कॅम्प परिसरात २१ जून रोजी आषाढी
वारीच्या पालखीच्या मार्गावर एका महिलेने वारकऱ्यांवर मटणाचा तुकडा
फेकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. त्यानंतर नंतर या वारकऱ्यांनी तिला जाब
विचारला. तेव्हा या महिलेने या वारकऱ्यांनाच शिविगाळ केला. हा प्रकार
पुण्यातील धार्मिक शांततेसाठी धक्का देणारा ठरला आहे
नेमकी काय घटना घडली?
पालखी मानमादेवी चौकाजवळून जात होती. यावेळी पालखीच्या मार्गावर अनेक दिंडी त्यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी ५७ वर्षांची नसीमा शेख असे नाव असलेल्या महिलेने मटणाचा तुकडा वारकऱ्यांवर फेकला. त्यावर काहींनी आक्षेप घेतला. वारकरी माया धुमाळ यांनी जाब विचारला. तेव्हा महिला म्हणाली, "मला भिती वाटत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. मी पोलिसांनाही घाबरत नाही." याबाबत संबंधित महिलेशी वारकरी अक्कलवंत राठोड यांनी संवाद साधला. यावेळी त्या महिलेनं उत्तर देताना "मला कोणाचीही भीती नाही… जे काही करायचं ते कर." असं उत्तर दिल.
पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर परिसरातील पोलीस अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. संबंधित महिला नसीमा शेख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. आवश्यक माहिती घेण्यात आली. लष्कर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली.
वारी - धार्मिक ऐक्याचे प्रतीक
आषाढी वारी हा महाराष्ट्रातील प्राचीन वारकरी परंपरेचा एक भाग असून तो धार्मिक एकता आणि सामाजिक समता याचा संदेश देणारा आहे. सरकारने त्या मार्गावरील मांस आणि मद्यविक्रीवर बंदी आणली आहे. ही घटना वारीच्या ऐक्याला तडा देणारी ठरली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.