बँकींग आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने प्रोबेशनरी ऑफिसरची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या परिक्षेसाठी नोटीफिकेशनही जारी केली असून तब्बल ५४१ पदांसाठी ही भरती होणार आहे.
कधीपर्यंत करता येणार अर्ज
स्टेट बँकेच्या पीओ भरतीची अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवार ७ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात, श्रेणीनुसार वेगवेगळे शुल्क आकारले जाणार आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदांसाठी भरती होणार असल्याने अनेक जण या भरती प्रक्रियेची वाट पाहत होते.
कुठे कराल अर्ज
दरवर्षी लाखो उमेदवार या प्रतिष्ठित परीक्षेत बसतात. एसबीआयने २४ जून रोजी प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. यावेळी एकूण ५४१ पदांची भरती केली जाईल. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आज २४ जूनपासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
प्रोबेशनरी ऑफीसर पदांसाठी पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.
कोणत्या संवर्गासाठी किती आहे अर्ज शुल्क
जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क ₹ ७५० आहे.
एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
कशी असेल निवड प्रक्रिया
या भरती प्रक्रियेचे तीन टप्पे असतील उमेदवारांची निवड तीन टप्प्यात केली जाईल. यामध्ये पुर्वचाचणी परिक्षा, मुख्य परिक्षा आणि मुलाखत आणि ग्रुप एक्झरसाईच परीक्षा असेल. पहिली परिक्षेनंतर मुख्य परिक्षेसाठी पात्रता ठरणार आहे अंतिम निवड मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
प्रोबेशनरी ऑफीसरसाठी पगार किती?
या भरतीअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ४८,४८० रुपये बेसिक पगार मिळेल. याशिवाय इतर भत्ते देखील दिले जातील. देशभरातील कोणत्याही शाखेत नोकरीची पोस्टिंग करता येते.
कोणत्या संवर्गासाठी किती जागा?
खुल्या संवर्गासाठी २०३, जागाआर्थिकदृष्ट्या मागास संवर्गासाठी ५० जागाओबीसींसाठी १३५ जागाएससी संवर्गासाठी ७५ जागाएसटी संवर्गासाठी ३७ जागाइतर संवर्ग आणि महिला आरक्षण मिळून ४१ जागा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.