मुस्लिमांनी बकरी ईद कशी साजरी करायची, हे सांगायला नितेश राणे मुफ्ती आहे का?, राष्ट्रवादीच्या आमदाराची टीका
बकरी ईदच्या कुर्बानीवरून मंत्री नितेश राणेंनी केलेल्या विधानावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडींनी नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. बकरी ईद कशी साजरी करायची,हे सांगायला नितेश राणे मुफ्ती आहे का? असा सवाल करत वाचळवीर नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला शहाणापण सांगण्याची गरज नाही,अशी टीका देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी केली आहे.
मंत्रिपदाची शपथ घेऊन बालिशपणाचे विधान करणाऱ्या नितेश राणेंना आवर घालण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करणार असल्याचेही आमदार नायकवडी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या पशूंची कुर्बानी मुस्लिम समाजाकडून देण्यात येत नाही. ती होऊ नये, याचीही जबाबदारी मुस्लिम समाजाची असल्याचेही आमदार इद्रिस नायकवडी यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीच्या मिरजेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले होते नितेश राणे?
नितेश राणे यांनीपर्यावरणवादी आणि प्राणी हक्क कार्यकर्त्यांवर टीका केली होती आणि विचारले की त्यांनी "व्हर्च्युअल" बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन का केले नाही. पर्यावरणवादी केवळ होळी आणि दिवाळी सारख्या हिंदू सणांना लक्ष्य करतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.