Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारताच्या पंतप्रधानांचा दररोजचा खर्च किती? आकडे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

भारताच्या पंतप्रधानांचा दररोजचा खर्च किती? आकडे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीयदृष्ट्या जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच ते आपल्या साध्या जीवनशैलीसाठी आणि कठोर दिनचर्येसाठीही ओळखले जातात. त्यांच्या आहार, वेशभूषा आणि काम करण्याच्या पद्धतीने अनेकांना आकर्षित केलं आहे. मात्र अनेकांना सतत एकच प्रश्न पडतो की इतक्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा सरकारदररोज किती खर्च करते? आज आपण याच प्रश्नाचं विश्लेषण करूया. पंतप्रधान पद हे भारतातील सर्वाधिक महत्त्वाचं पद आहे. देशाच्या सुरक्षा, धोरणं, आंतरराष्ट्रीय संबंध, आणि अंतर्गत प्रशासन यासारख्या सर्व जबाबदाऱ्या पंतप्रधानांकडे असतात. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन सुरक्षेपासून ते प्रवासापर्यंत सर्व गोष्टी सरकारच्या माध्यमातून अत्यंत नियोजितपणे पार पाडल्या जातात.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘एसपीजी’ म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे सुरक्षा कवच मिळालं आहे. हे सुरक्षा कवच अत्यंत उच्च दर्जाचं असून यामध्ये २४ प्रशिक्षित एसपीजी कमांडोंचा समावेश असतो, जे २४x७ त्यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवतात. 2022-23 साली एसपीजीसाठी भारत सरकारने 385.95 कोटी रुपये खर्च केले होते. म्हणजेच दररोज सुमारे 1.17 कोटी रुपये फक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खर्च केले जातात. जर आपण याचा तासागणिक हिशोब केला तर दर तासाला 4.90 लाख रुपये खर्च होतो. पंतप्रधानांना देशाच्या विविध भागांमध्ये आणि परदेशात देखील वारंवार प्रवास करावा लागतो. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यासाठी विशेष सुरक्षेची, सरकारी विमानांची आणि कार्यक्रम व्यवस्थापनाची आवश्यकता असते. या सर्व गोष्टींचा खर्च केंद्र सरकार उचलते.

मात्र जेव्हा त्यांच्या व्यक्तिगत आहाराविषयी विचार केला जातो, तेव्हा आश्चर्याची बाब म्हणजे - पंतप्रधान मोदी यांचा आहार अत्यंत साधा आणि नियमबद्ध आहे. 2015 साली एका आरटीआयच्या माध्यमातून उघड झालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या आहाराचा खर्च स्वतः करतात. म्हणजे सरकार त्यांच्या खानपानासाठी एक पैसाही खर्च करत नाही. सरकार त्यांच्या निवासस्थान, सुरक्षा, कार्यालयीन कामकाज, प्रवास आणि अधिकृत दौऱ्यांचा खर्च उचलते. पण त्यांचं खासगी जीवन अतिशय शिस्तबद्ध असून त्यात कोणताही अपव्यय होत नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.