राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी गावात आज शुक्रवारी (२५ जुलै २०२५) रोजी सकाळी एका सरकारी शाळेत मोठी दुर्घटना घडली. सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान शाळेच्या इमारतीचे छत अचानक कोसळले.
प्रार्थनेदरम्यान छत कोसळले
विद्यार्थी शाळेच्या नियमित प्रार्थना सभेला उपस्थित असताना हा अपघात झाला. दरम्यान, अचानक शाळेचे छत कोसळले. या ढिगाऱ्याखाली अनेक विद्यार्थी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच लोकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. घटनेचे गांभीर्य पाहून प्रशासनाने जेसीबी मशीन बोलावून ढिगारा काढण्यास सुरुवात केली. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे.
जखमींना रुग्णालयात केले दाखल
ढिगाऱ्यातून
बाहेर काढलेल्या जखमी विद्यार्थ्यांना तातडीने मनोहरठाणा येथील आरोग्य
केंद्रात दाखल करण्यात आले. काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना
झालावाड जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.