आता सरकारी कर्मचारी ३० दिवसांची सुट्टी घेऊ शकणार आहेत. केंद्रीय कर्मचारी आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी ही सुट्टी घेऊ शकतात. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला मिळाला आहे.
३० दिवसांची सुट्टी
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी ३० दिवसांसाठी Earned Leave घेऊ शकतात. आपल्या वैयक्तिक कामासाठी आणि आईवडिलांची काळजी घेण्यासाठी ही सुट्टी घेऊ शकतात.
मंत्र्यांनी सांगितले की, केंद्रिय सिविल सेवा नियम, १९७२ अंतर्गत कर्मचारी दरवर्षी ३० दिवसांची Earned Leave घेऊ शकतात. तसेच ८ दिवसांची आकस्मिक सुट्टी (Casual Leave) घेऊ शकतात. तसेच २ दिवसांची सुट्टी मिळते. या सुट्ट्या ते आपल्या वैयक्तिक कारणांसाठी घेऊ शकतात. डॉ. सिंह यांनी सांगितले की, केंद्र सरकार आपल्या वयोवृद्ध आईवडिलांसाठी विशेष सुट्टी देते. त्यामुळे कोणत्याही स्पेशल लिव्हची गरज भासत नाही. कारण त्यांना आधीपासूनच सुट्ट्या मिळतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होतो.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या वैयक्तिक कामांसाठी वेळ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना ३० दिवसांची भरपगारी सुट्टी मिळते. त्यामुळे तुमची सॅलरी कट होणार नाहीये. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयाचं केंद्रीय कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय नवीन निर्णय घेण्यात आला आहे?
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वयोवृद्ध आईवडिलांची देखभाल करण्यासाठी दरवर्षी ३० दिवसांची रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.ही रजा कोणत्या नियमांतर्गत मिळणार आहे?ही रजा केंद्रिय सिव्हिल सेवा नियम, १९७२ (Central Civil Services Rules, 1972) अंतर्गत मिळणार आहे.ही रजा कशासाठी घेता येते?ही रजा वैयक्तिक कारणांसाठी तसेच वयोवृद्ध आईवडिलांची देखभाल करण्यासाठी वापरता येते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.