Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कार्यालयीन वेळेत काम थांबवून शिरूरच्या निवासी नायब तहसीलदारांच्या निरोप समारंभाचा थाट...

कार्यालयीन वेळेत काम थांबवून शिरूरच्या निवासी नायब तहसीलदारांच्या निरोप समारंभाचा थाट...


शिरूर,ता.३: शिरूर तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत निवासी नायब तहसीलदारांचा निरोप समारंभ पार पडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.सरकारी कामकाज रोखून,वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत,अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निरोप समारंभात सहभाग घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शासकीय कार्यालये ही जनतेच्या कामासाठी असलेली ठिकाणे आहेत.अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक समारंभ घेणे नियमबाह्य आहे.मात्र,शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अनुपस्थितीत,निवासी नायब तहसीलदारांचा निरोप समारंभ आयोजित केला होता.त्यावेळी महसूल नायब तहसीलदार,संजय गांधी योजना विभाग प्रमुख,अव्वल कारकून,महसूल सहाय्यक व इतर कर्मचारी कामकाज थांबवून निरोप समारंभात सहभागी झाले होते.

शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे म्हणजे स्पष्टपणे नियमांचे उल्लंघन आहे.असा आरोप सामाजिक कार्यकर्ता निलेश वाळूंज यांनी केला आहे.तसेच संबंधित निवासी नायब तहसीलदारांवर या आधीही नागरिकांना कामासाठी त्रास दिल्याचे आरोप आहेत.असे निलेश वाळूंज यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सांगितले.

तसेच याबाबत वाळूंज यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय अधिकारी पूनम अहिरे, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे लेखी व ऑनलाईन द्वारे तक्रार दाखल केली आहे.त्याचप्रमाणे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार असल्याचे ही वाळूंज यांनी सांगितले.

“या घटनेबाबत महसूल विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना समज देण्यात येणार असून,पुन्हा असा प्रकार घडल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.”
– पूनम अहिरे(उपविभागीय अधिकारी,शिरूर)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.