अजून बंगला का सोडला नाही? धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले हृदय पिळवटून टाकणारे सत्य...
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे निवृत्तीनंतर सहा महिने तसेच विशेष मुदत संपूनही सरकारी बंगल्यात राहत आहेत. त्यांच्या ताब्यातून हा बंगला घ्यावा, अशी विनंती करणारे पत्र सुप्रीम कोर्ट प्रशासनाने संबंधित मंत्रालयाला लिहिले आहे.
कोर्ट प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचवेळी चंद्रचूड यांनी अद्याप बंगला का सोडला नाही, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सुप्रीम कोर्ट प्रशासनाच्या पत्रानंतर चंद्रचूड यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितलेले कारण हृदय पिळवटून टाकणारे आहे. विशेष गरजा असलेल्या दोन मुलींचे कारण त्यांनी दिले आहे. मुलींना गंभीर आजार आणि अनुवांशिक समस्या आहेत. विशेषतः नेमलाइन मायोपॅथी या आजारावर एम्समधील तज्ञांकडून उपचार सुरू आहेत, असे माजी सरन्यायाधीशांनी सांगितले.
कुटुंबासाठी योग्य, आरामदायी घर शोधण्यासाठी वेळ लागल्याचे चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचेही चंद्रचूड यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत आपण घर सोडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, न्यायमूर्ती चंद्रचूड आणि पत्नी कल्पना दास यांच्या प्रियांका आणि माही या दोन दत्तक मुली आहेत. त्या दोघींना नेमालाइन मायोपॅथी हा दुर्मिळ स्वरुपाचा आजार आहे. त्यांच्यासाठी आई-वडील सर्व सोयीसुविधा असलेले घर शोधत होते. मागील काही महिने त्यांना असे घर मिळतच नव्हते. याबाबत त्यांनी उघडपणे नाराजीही व्यक्त केली होती.
प्रत्येक सार्वजनिक ठिकाण एकसारखेच असल्याने विशेष गरजा असलेल्या आपल्या दोन्ही मुलींसाठी घर मिळणे कठीण झाल्याचे ते एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. त्यामुळे मुलींसाठी योग्य घर शोधण्यात चंद्रचूड यांचा बराच कालावधी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच त्यांना सरकारी बंगला सोडण्यास विलंब होत आहे.
सुप्रीम कोर्ट प्रशासनाने याबाबत केंद्र सरकारला पत्र पाठवून बंगला ताब्यात घेण्याची विनंती केली असली तर सरकार काय भूमिका घेणार, हे लवकरच स्पष्ट होईल. चंद्रचूड हे मागील वर्षी निवृत्त झाले आहे. निवृत्तीनंतर सहा महिने तर सरकारी बंगल्यात राहू शकतात, असा नियम आहे. ती मुदत उलटून गेली आहे. त्याचप्रमाणे त्यांना वाढवून दिलेली विशेष मुदतही ३१ मेलाच संपली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.