Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात

चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
 

यवतमाळ:  शहरातील माहूर मार्गावर माेहागावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विदेशी दारूची विक्री सुरू हाेती. ट्रकमधून दारूच्या पेट्या दुचाकीस्वारांना दिल्या जात हाेत्या. महिती मिळताच गुरुवारी दुपारी जमादार पंकज पातूरकर यांनी घटनास्थळ गाठले. तेथील प्रकार पाहून त्यांनी पुसद शहर ठाणेदारांना माहिती दिली. पाेलिस स्टाफ पाेहाेचताच सात आराेपींना ४० लाख २३ हजार ३६० रुपये किमतीच्या विदेशी दारूसह ताब्यात घेतले.

शिवाशीष रेसीडेन्सी ले-आउट कमानीजवळ ट्रक क्रं.एम एच १२ वायबी ००४८ मध्ये ग्रीन लेबल व्हिस्की १८० एम.एल. क्षमतेच्या १८ हजार २८८ बॉटल्स भरलेली हाेती. ट्रक चालक हा विदेशी दारू दुचाकीस्वारांना अवैधरित्या विकत हाेता. ठाणेदार सेवानंद वानखडे व पथकाने मनीष ईश्वर सुरूळे (१९ ह.मु. यश दुर्गे यांचे घरी डोकसावंगी, कारेगाव, ता. शिरूर), प्रवीण दत्ता जिजोरे, (३० रा. वाई गौळ, ता. मानोरा, जि. वाशिम), रामेश्वर मधुकर पवार (२४), सचिन उद्धल चव्हाण (२३), सतीष श्रावण चव्हाण (२४), गोकूळ बाबुसिंग चव्हाण (२३), विक्रम बळीराम जाधव (२०) चाैघेही रा. तुळशीनगर, ता.महागाव, जि. यवतमाळ यांना ताब्यात घेतले. आराेपींजवळून सात मोबाइल, तीन दुचाकी, ट्रक असा ६४ लाख ७२ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आराेपी विराेधात पुसद पाेलिस ठाण्यात कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

दारूच्या ट्रकवर राज्यमंत्र्यांचे नाव
 
पुसद शहर पाेलिसांनी धाड टाकून पकडलेल्या ट्रकवर राज्यमंत्री मेघना साकाेर - बाेर्डीकर असे नाव लिहिले आहे. हा ट्रक नेमका कुणाच्या नावाने आहे, त्यावर राज्यमंत्र्यांचे नाव का टाकले आहे याबाबत विचारणा केली असता पुसद उपविभागीय पाेलिस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. यांनी याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. तर, पुसद शहर ठाणेदार सदानंद वानखडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.