आ.जयंतराव पाटील, प्रतिक पाटील पिता-पुत्रांचा दिल्लीत पुरस्कार प्रदान
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांचा सत्कार सोहळा दिल्लीत आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात ‘द शुगर टॅक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) तर्फे साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जयंत पाटील यांना ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांना ‘इंडस्ट्री एक्सीलन्स अवॉर्ड 2025’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारांमुळे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचा इतिहास
राजारामबापू सहकारी साखर कारखाना, इस्लामपूर, सांगली जिल्ह्यातील एक महत्वाचा साखर कारखाना आहे. हा कारखाना 1969 मध्ये सुरू झाला आणि 1970 पासून त्याने कामकाज सुरू केले. मंत्री राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली, हा कारखाना महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीत एक महत्त्वाचे नाव बनला आहे. स्व. राजाराम बापू पाटील यांच्यानंतर मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कारखान्याची जबाबदारी आली व त्यांनी तब्बल 10 वर्षे चेअरमन म्हणून कामकाज पाहिले. त्यानंतर जयंत पाटील यांनी या कारखान्याची धुरा आपल्या इतर सहकाऱ्यांकडे दिली.
मागील दोन वर्षांपूर्वी जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी कारखान्याची निवडणूक लढवली व विजयी झाले. आज प्रतीक पाटील अतिशय योग्य पद्धतीने कारखान्याचे कामकाज पाहत आहेत. कधीकाळी एक युनीट पर्यंत मर्यादित असणारा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे आज चार युनिट कार्यरत आहेत.
दरम्यान, आपल्या कारखान्याच्या माध्यमातून मिळालेले हे पुरस्कार म्हणजे कारखान्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.