नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी निवडणूक प्रचारादरम्यान खाजगी माध्यमांना एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, "देवाने मला या जगात पाठवले आहे. काहीतरी साध्य करण्यासाठी देवाने मला पृथ्वीवर पाठवले आहे. मोदींच्या या वक्तव्यावर संदर्भ आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी वैयक्तित आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून वाद होण्याची शक्यता आहे.
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात सतत संघर्ष होताना दिसत आहे. संसदेत बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आरक्षणाची मर्यादा संविधानात 50 टक्के निश्चित करण्यात आली आहे, परंतु मोदी सरकारने त्यांच्या सोयीनुसार 10 टक्के अतिरिक्त आरक्षण जोडले आहे. त्यामुळे ही मर्यादा आता 60 टक्के झाली आहे. कारण पंतप्रधान मोदी आणि भाजपा सरकार मागासवर्गीयांना त्यांचे हक्क द्यायचे नाहीत. यासाठी आरक्षणाचा वापर करून ते त्यांचा अजेंडा पुढे नेत आहेत, असा आरोप खर्गे यांनी केला.पंतप्रधान मोदींवर टीका करताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "मोदी म्हणतात की, त्यांना देवाने पाठवले आहे. परंतु लग्नामुळे मुलं होतात, घरी झोपल्याने मुलं होत नाहीत. खरं तर मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार आहेत. जर आम्हाला आणखी काही जागा मिळाल्या असत्या, तर आम्ही भाजपा सरकार पाडले असते. कारण आरएसएस आणि भाजपा हे विष आहेत. त्यांना चाटू नका, जर त्यांना तुम्ही एकदा चाटले तर संपून जाल, असे वादग्रस्त वक्तव्य खर्गे यांनी केले आहे.दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मोदी खोटं बोलणारे असून ते देशाची दिशाभूल करत आहे. खोटं बोलणारे पंतप्रधान देशाचे आणि समाजाचे भले करू शकत नाही. परंतु राहुल गांधी हे उच्च जातीचे असूनही ते मागासवर्गीय आणि दलितांसाठी लढतात. त्यामुळे प्रत्येकाने त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. प्रत्येक गावात 2 ते 3 टक्के उच्च जातीचे लोक आहेत. तेलंगणाच्या सर्वेक्षणात, गावांमध्ये कुठेतरी 5 टक्के, कुठेतरी 10 टक्के उच्च जातीचे लोक आहेत. ते देशावर राज्य करतात, असेही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.