सोशल मीडियावर अपघाताचे अनेक थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. घरातून निघालेल्या लोकांवर काळाची झडप कधी पडेल, याचा काही नेम नाही. कारण प्रवासादरम्यान झालेली एक चूकही तुम्हाला मृत्यूच्या दारात ओढू शकते.
अशाच प्रकारची भीषण अपघाताची एक घटना उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये घडली आहे. हरिद्वारमध्ये अस्थि विसर्जन करण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या एकाच कुटुंबातील 6 जणांवर काळाने घाला घातला. भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकाचा ताबा सुटला आणि ती कार हायवेवर थांबलेल्या एका कंटेनरला धडकली. हा भयंकर अपघात टीटवी-पाणिपत-खातिमा मार्गावर घडला. या अपघाताचा थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
त्या हायवेवर नेमकं काय घडलं?
एक कुटुंबातील सहा जण हरिद्वारमध्ये अस्थि विसर्जन करण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. टीटवी-पाणिपत हायवेवरून ते प्रवास करत होते. त्याचदरम्यान, चालकाने कारची गती वाढवली आणि ते हायवेवरून सुसाट निघाले. पण चालकाला हायवेवर उभ्या असलेल्या कंटेनरला कट मारून पुढे जाता आलं नाही. भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या त्या चालकाचा ताबा सुटला आणि त्यांची कार कंटेनरला धडकली.चालकाला झोपेची डुलकी लागल्याने हा भयानक अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.
व्हायरल व्हिडीओ पाहून थरकापच उडेल
हायवेवर झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडीओ @deadlykalesh नावाच्या एक्स हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, हरिद्वारला अस्थि विसर्जनासाठी एर्टिगा कारने एकाच कुटुंबातील सहा जण प्रवास करत होते. चालकाना झोप लागल्याने भीषण अपघात घडला आणि कुटुंबातील सर्वांचाच मृत्यू झाला. हायवेवर उभ्या असलेल्या ट्रकला कार धडकली. हा अपघात टीटवी-पाणिपत-खातिमा मार्गावर घडली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.