यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे सुसाईड नोट लिहून अद्यापही गायब! इस्लामपूर, मिरज नंतर यवत येथे दंगली घडल्या; नारायण देशमुख यांना वाचविणारा नेमका आका कोण?
लोणी काळभोर, ता.6 : यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचार निखिल कैलास रणदिवे सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल करून मागील दोन दिवसांपासून गायब झाले आहेत. निखिल रणदिवे यांचा अद्यापही फोन बंद असल्याने त्यांच्या कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
निखिल रणदिवे यांचे बंधू अक्षय रणदिवे यांनी निखिल रणदिवे हे मिसिंग झाल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस ठाण्यात केली आहे. पोलीस कर्मचारीच जर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून मी जीवाचे बरे वाईट करत असल्याची पोस्ट तयार करत असेल तर हे एक पोलीस दलातील खूप मोठे दुर्दैव मानावे लागेल.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे कनिष्ठ महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार त्रास देत आहेत. दोन-दोन तास कर्मचाऱ्यांना कार्यालयात उभे करत आहेत. त्यांच्यासोबत अर्वाच्च भाषेत अरेरावी करत आहेत. त्यामुळे काही कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या बदल्या करून घेतल्या आहेत. काही कर्मचारी शिकात गेले आहेत. तर एका कर्मचाऱ्याने तत्कालीन जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना आत्महत्या करत आहे. असा मेसेजदेखील पाठविला होता. परंतु, नारायण देशमुख यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन पोलीस अधीक्षकाने आवर घातला असता तर नारायण देशमुख हे इतके बेफान सुटले नसते. अशी पोलीस दलात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे वरिष्ठांचे आदेश पायदळी तुडवीत आहेत. यवत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मागील तीन आठवड्यांपासून सुट्टी बंद केली आहे. सुट्ट्या बंद करायच्या असतील तर पोलीस महासंचालकाचे आदेश लागतात. परंतु, नारायण देशमुख यांनी हुकुमशाहीने सर्वांच्या सुट्ट्या बंद केल्या आहेत. हे अधिकार देशमुख यांना कोणी देले? तसेच काही महिन्यांपूर्वी निखिल रणदिवे यांनी वरवंड येथे गुटखा पकडला होता. हा गुटखा एका राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यावसायिकाचा होता. तसेच त्याचे आर्थिक हितसंबंध असल्याने नारायण देशमुख यांनी निखिल रणदिवे यांना डोळ्यावर धरले होते. त्यामुळे रणदिवे यांना बक्षीस देण्याऐवजी त्यांची केडगाव चौकीला बदली केली होती. देशमुख यांनी कर्मचाऱ्यांचे खोटे रिपोर्ट बनवून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले आहेत. देशमुख त्यांच्या कार्यपद्धतीला कर्मचारी कंटाळले आहेत. त्यामुळे एकंदरीतच त्यांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
दरम्यान, पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांची सन 2025 मध्ये शिक्रापुर पोलीस ठाण्यात सर्वसाधरण बदली झाली आहे. परंतु, त्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त न करता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे त्रास देत आहेत. तसेच देशमुख हे कर्मचाऱ्यांना त्रास देऊन खच्चीकरण करत आहे. त्यामुळे देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्युस नारायण देशमुख जबाबदार आहेत. असे सुसाईड नोटमध्ये रणदिवे यांनी लिहिले आहे. मागील दोन दिवसांपासून गायब झाले आहेत. त्यांचा फोन बंद लागत आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडून अद्यापही त्यांची दखल घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मुलीला लिहिली भावनिक पोस्ट
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे मला गेली 1 वर्षापासून सतत त्रास देत आहे. माझा नाईलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे. माझी प्रिय दिदी, आज तुझा पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथे वरिष्ठांची मनमानी चालते. तसेच चार पाच दिवसापूर्वी तु आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य करण्यासाठी नेमल्यामुळे तुला हॉस्पीटलमध्ये घेऊन जाता आले नाही. माझ्याकडून दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा. तसेच स्वतःच्याच फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजली लिहून निखिल रणदिवे यांनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.
इस्लामपूर, मिरज व यवत येथे दंगली घडल्या?
नारायण देशमुख हे इस्लामपूर व मिरज या दोन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना देखील त्या ठिकाणी दंगली झाल्या होत्या. तसेच यवत पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळल्यानंतर देखील दंगल झाली आहे. दंगल घडून नये म्हणून 300 पोलिसांचा ताफा या ठिकाणी नेमण्यात आला होता. तरीही दंगल घडणे म्हणजे हे एक बेजबाबदार अधिकाऱ्याचे लक्षण म्हणावे लागेल. या दंगलीमध्ये 500 ते 600 आरोपी होते. परंतु, त्यामधील केवळ 18 आरोपींना अटक केली होती. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी नोटीस बजावली होती. इस्लामपूर, मिरज व यवत येथील दंगली या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या कार्यकाळात घडल्या आहेत.
नारायण देशमुख यांना वाचविणारा नेमका आका कोण?
यवत पोलीस ठाण्यात पोलिसिंग राहिलेली नाही. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी या अवैध धंद्यांची लिस्ट लेटर बॉम्बच्या माध्यमातून सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या वरिष्ठ कार्यालयाला अनेक कर्मचाऱ्यांनी तक्रारीदेखील केल्या आहेत. परंतु, अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे नारायण देशमुख यांना वाचविणारा नेमका आका कोण? असा सवाल उपस्थित झाला आहे.निखिल रणदिवे हे गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली आहेत. 1 वर्षापासून बदली होऊनही त्यांना यवत पोलिस ठाण्यातून मुक्त करण्यात आलेले नाही. बाहेरगावी पाठवून परत आल्यानंतर पुन्हा लगेच दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात होते. याच त्रासाला कंटाळून ते गायब झाले आहेत. जो पर्यंत ते येत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्याच्या बाहेर जाणार नाही.-अक्षदा रणदिवे (निखिल रणदिवे यांची पत्नी)निखिल रणदिवे यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना केले आहे. निखिल रणदिवे यांनी व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून केलेल्या आरोपाबाबत संपूर्ण तपासणी केली जाईल.– बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.