आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर अनेक अनुयायांची गर्दी झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं दर्शन घेण्यासाठी हजारो अनुयायी दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. सकाळी राज्य सरकारकडून आदरांजली सभेचं आयोजन केले होते. तसेच या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ५०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. चैत्यभूमीवर अनुयायांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दरवर्षी ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर बाबासाहेबांची अनुयायांची गर्दी होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.