सांगली :- जनरेटरअभावी शासकीय रुग्णालयात अंधार:, सिटी स्कॅन, एक्स- रे मशीन बंद:, तीन महिन्यांत जनरेटर बसवणार : अधिष्टाता डॉ. प्रकाश गुरव
सांगली : येथील शासकीय रुग्णालयामधील विद्युत पुरवठा बंद पडल्यामुळे एक्स-रे, सिटी स्कॅन मशीन बंद ठेवावे लागत आहे. यामुळे दिवसभर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ताटकळत थांबत आहेत. जनरेटर नसल्यामुळे प्रत्येक मंगळवारी हा प्रकार होत आहे.
यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे, त्याचबरोबर जनरेटर नसल्यामुळे मंगळवारी दिवसभर एक्स-रे विभाग व सिटी स्कॅन मशीन बंद राहिले. त्यामुळे आकस्मिक विभागात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सकाळी आठ वाजल्यापासून रांगेत थांबावे लागले. सर्व साधने नादुरुस्त असल्यामुळे रुग्णांची हेळसांड झाली. आयसीयु वगळता जवळपास सर्वच शासकीय रुग्णालयात अंधार होता. शल्यचिकित्सक विभाग, औषध वैद्यकशास्त्र विभागात अंधार असल्याने वैद्यकीय अहवाल तपासता येत नसल्यामुळे अनेक रुग्ण ताटकळत थांबल्याचे दिसून आले. यावेळी वैद्यकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रशासकीय बैठकीसाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले शासकीय रुग्णालयाचे कामकाज गेल्या वर्षभरपासून एका जनरेटरवर सुरू आहे. प्रत्येक मंगळवारी विद्युत पुरवठा खंडित असतो. परगावातून येणाऱ्या रुगानांचे हाल सिव्हिल प्रशासन लक्ष देणार का हा खरा प्रश्न आहे.
तीन महिन्यांत जनरेटर बसवणार : डॉ. प्रकाश गुरव सांगलीच्या शासकीय रुग्णालयासाठी उच्च दर्जाचे जनरेटर
बसवण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कक्षाचे बांधकामही सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी दिली. सध्या विविध विभागांची विद्युत यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. आगामी तीन महिन्यांत वीज पुरवठा अखंडित सुरू राहण्याच्यादृष्टीने नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.