Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत सराईत गुन्हेगाराकडून तलवार, कोयता जप्त:, सांगली एलसीबीची कारवाई

सांगलीत सराईत गुन्हेगाराकडून तलवार, कोयता जप्त:, सांगली एलसीबीची कारवाई


सांगली शहरात धारदार तलवार आणि कोयता घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. यशराज अनिल दुधाळ (रा. स्वामी समर्थ कॉलनी, गल्ली नं. १, चानलेसवाडी, विश्रामबाग, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी बेकायदा शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तयार केले होते. पथक विश्रामबाग येथील शंभर फुटी रस्ता परिसरात गस्त घालत असताना धामणी रोडवरील इरसेड भवन चौकात एकजण तलवार, कोयता घेऊन थांबल्याची माहिती पथकाला मिळाली.

पथकाने तेथे जाऊन दुधाळ याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ कोयता, तलवार सापडली. त्याला अटक करून विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, संदिप गुरव, अतुल माने, इम्रान मुल्ला, रणजीत जाधव, अरुण पाटील, सोमनाथ गुंडे, अभिजीत ठाणेकर, सूरज थोरात, रोहन घस्ते यांच्या पथकाने ही कारवाई केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.