🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवृत्तीला वर्षभर बाकी, पण अवघ्या 20 हजारांच्या लाचेने केला गेम ; सुरगाण्याचे PSI एसीबीच्या जाळ्यात

निवृत्तीला वर्षभर बाकी, पण अवघ्या 20 हजारांच्या लाचेने केला गेम ; सुरगाण्याचे PSI एसीबीच्या जाळ्यात


अवघ्या वर्षभरावर निवृत्ती असताना सुरगाणा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक (PSI) चंद्रकांत शिवाजी दवंगे (वय ५७) हे २० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. 
सुरगाणा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत संशयिताच्या आई-वडिलांकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपनिरीक्षकासह एका खासगी व्यक्तीला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. पोलिस उपनिरीक्षक दवंगे यांनी इब्राहिम करीम वाणी यांच्या मदतीने लाचेची रक्कम स्विकारली असता सापळा लावलेल्या पोलिसांनी दोघांना रंगेहात बेड्या ठोकल्या.

एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध सुरगाणा पोलिस ठाण्यात अपहरण व लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानवे गुन्हा दाखल आहे. तो सध्या नाशिक सेंट्रल जेलमध्ये आहे. या गुन्ह्याचा तपास दवंगे यांच्याकडे होता. त्यांनी १९ जून रोजी संशयिताच्या आई-वडिलांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावून दिवसभर बसवून ठेवले.  
त्यानंतर, 'तुम्हालाही गुन्ह्यात आरोपी करतो,' अशी धमकी देत ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. अखेरीस २० हजार रुपये देण्यावर तडजोड झाली. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणीत तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर सापळा रचण्यात आला.


अशी उघडकीस आली लाचखोरी
सुरुवातीला तक्रारदाराला २१ आणि २४ जून रोजी लाचेची रक्कम देण्यासाठी पाठविण्यात आले; मात्र दवंगे बाहेरगावी असल्याने व्यवहार झाला नाही. त्यानंतर ३० जून रोजी तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन थेट पोलिस ठाण्यात गेले असता, दवंगे यांनी ती स्वीकारण्यास टाळाटाळ केली.

अखेर शुक्रवारी (ता. ३१) त्यांनी तक्रारदाराला सुरगाणा पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीलगत असलेल्या किराणा दुकानात बोलावले. तेथे खासगी व्यक्ती इब्राहिम वाणी याच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी दवांगे व वाणी या दोघांविरुद्ध सुरगाणा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.