🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील होलार समाजाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव जावीर यांचे अल्पशा आजाराने निधन; मंगळवारी अमरधाम येथे रक्षाविसर्जन​

सांगलीतील होलार समाजाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव जावीर यांचे अल्पशा आजाराने निधन; मंगळवारी अमरधाम येथे रक्षाविसर्जन

सांगली येथील होलार समाजाचे ज्येष्ठ नेते आणि वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी उत्तमराव जावीर (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे होलार समाज तसेच सांगली व सांगोला परिसरावर  शोकाकुल कळा पसरली आहे.

​उत्तमराव जावीर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नाझरे गावचे रहिवासी होते. नोकरीनिमित्त सांगलीत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रदीर्घ काळ सेवा बजावली आणि तेथून ते सेवानिवृत्त झाले होते. सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असणारे जावीर यांनी होलार समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी मोठे योगदान दिले होते. आपल्या मनमिळाऊ व संघर्षशील स्वभावामुळे त्यांचा सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात मोठा लोकसंपर्क होता. ​त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. ​दरम्यान, स्व. उत्तमराव जावीर यांचा रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम मंगळवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता अमरधाम स्मशानभूमी, सांगली येथे होणार असल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.