Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधी स्वयंसेवक निवडीसाठी 26 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

विधी स्वयंसेवक निवडीसाठी 26 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


सांगली, दि. 14,  : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली मार्फत विधी स्वयंसेवकांची (P.L.V.) निवड केली जाणार आहे.  त्याकरीता 18 ते 65 वर्षे वयोगटातील सांगली जिल्ह्यातील रहिवाशांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी सोमवार, दि. 26 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत विहीत नमुन्यात अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली (जिल्हा न्यायालय) अथवा तालुका विधी सेवा समिती (तालुका न्यायालय) येथे सादर करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले यांनी केले आहे.

विधी स्वयंसेवक म्हणून निवड होण्यासाठी अर्जदार हा सांगली जिल्ह्यातील रहिवाशी असावा. कमीत कमी दहावी पास असावा. एक ते दोन वर्षे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत काम करण्याची इच्छा असावी आणि स्वत:चा मोबाईल/स्मार्टफोन असावा. विधी स्वयंसेवकाच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने वेळोवेळी निश्चित केलेल्या मानधनाव्यतिरीक्त कोणतेही वेतन अथवा मोबदला मिळणार नाही. अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्जासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली अथवा तालुका विधी सेवा समिती यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. नरडेले यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.