सांगली राजमती भवन येथे भव्य ‘रामकथा व ध्यान शिबिराचे’ आयोजन
सांगली येथील अध्यात्मप्रेमी, साधकांसाठी दि. १७.०९.२०२२ ते २१.०९.२०२२ या कालावधीत सकाळी ०६:३० ते ०८:०० यावेळेत ध्यानसाधना शिबिर व सायंकाळी ०६:०० ते ०७:३० यावेळेत श्री. रामकथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात चिन्मय मिशनचे स्वामी ‘प्रत्ययानंद सरस्वती’ मार्गदर्शन करणार आहेत.
स्वामी ‘प्रत्ययानंदजी सरस्वती’ यांनी आत्तापर्यंत श्रीमदभगवद्गीता, श्रीमदभागवत, दासबोध, ज्ञानेश्वरी, श्री. संत तुकारामांची गाथा, श्री. विष्णूसहस्त्रनाम, श्री. तुलशीरामायण इत्यादी विषयांवर देशभरात विविध ठिकाणी ज्ञानयज्ञ, श्रवणसाधना शिबिरे घेतलेली आहेत. सध्या ते चिन्मय मिशन नांदेडचे प्रमुख आचार्य आहेत.
सध्याच्या सततच्या धावपळीच्या जीवनात आपले मन स्वास्थ्य व आरोग्य संतुलित ठेवून आपले दैनंदिन काम तणावरहित, उत्साहाने व एकाग्रतेने करण्यासाठी व आनंदी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असे हे शिबिर असून याचा लाभ समस्त सांगली व परिसरातील साधकांनी करून घ्यावा असे आवाहन या शिबिराचे मुख्य आयोजक श्री. सुरेश पाटील माजी महापौर, सांगली यांनी केलेले आहे. सदर शिबिर हे चिन्मय मिशन सांगली व राजनेमी आयुर्वेद व नॅचरोपॅथी सेंटर सांगली यांनी आयोजित केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
