इंडोनेशियात भूकंप! 162 जण ठार..
शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी इंडोनेशिया पुन्हा हादरले. राजधानी जकार्तानजीक जावा बेटावर सकाळी 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर अफ्टर शॉक्स सुरू राहिले. यामुळे अनेक इमारती, घरे जमीनदोस्त झाली असून, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. रात्री उशिरापर्यंत किमान 162 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत तर 700वर नागरिक जखमी आहेत. ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जकार्तापासून 100 किलोमीटर अंतरावर पश्चिम जावा प्रांतामध्ये सियांचूर येथे भूकंपाचे केंद्रबिंदू 10 कि. मी. खोलवर होते. 5.6 रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदविली गेली. जकार्तासह अनेक शहरांनाही हादरे बदले. त्यामुळे देशभरात प्रचंड घबराहट पसरली. नागरिक घराबाहेर पळत खुल्या जागेवर, रस्त्यांवर आले. मात्र, सर्वांत भयंकर हानी पश्चिम जावा प्रांतामध्ये झाल्याचे इंडोनेशिया सरकारने म्हटले आहे.
शेकडो लोक ढिगाऱ्याखाली
सियांचूर आणि परिसरातील शेकडो इमारती, घरे जमीनदोस्त झाली आहेत. 56 जणांचा मृत्यू झाला, तर किमान 700 जण जखमी आहेत. अनेक जखमींचे हात-पाय मोडले आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जमीनदोस्त इमारतींमध्ये शेकडो नागरिक अडकले असून, त्यात महिला, लहान मुले मोठय़ा प्रमाणावर आहेत. ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हॉस्पिटल्स कोसळले
भूकंपाची तीव्रता इतकी भयंकर होती की, सियांचूर आणि परिसरातील हॉस्पिटल्सच्या इमारती कोसळून जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे डॉक्टरांकडून तंबू उभारून जखमींवर उपचार केले जात आहेत.
संपूर्ण देशच भूकंपाचे केंद्रबिंदू
गेल्या काही वर्षांत संपूर्ण इंडोनेशियाच भूकंपाचा केंद्रबिंदू बनले आहे. यापूर्वी इंडोनेशियात अनेकदा भूकंपाचे धक्के बसून त्सुनामी आलेली आहे. त्यामुळे हजारो लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
2004 मध्ये 12 देशांमध्ये शवािॊतशाली भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीत तब्बल 2 लाख 30 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात सर्वाधिक बळी इंडोनेशियातील होते. जानेवारी 2021 मध्ये भूकंपात 100 जण ठार आणि 6500 जण जखमी झाले होते. या वर्षी फेब्रुवारीत आलेल्या भूकंपात 25 जणांचा मृत्यू झाला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.