सांगली जिल्ह्यातील एका नेत्याच्या रक्षकाने मोठे कांड केल्याची चर्चा आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यातील एका नेत्याच्या रक्षकाने मोठे कांड केल्याची चर्चा आहे. त्या रक्षकाने जिल्ह्यातीलच एकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्या तक्रार अर्जाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतल्याचे समजते. येत्या दोन दिवसात या प्रकरणाबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातील एका नेत्याचा रक्षक म्हणून एकजण कर्तव्य करत आहे. नेता तालेवार असल्याने या रक्षकालाही चांगलेच पंख फुटल्याची चर्चा आहे. संबंधित नेता बाहुबली असल्याने त्या रक्षकाने फारच मोठे धाडस केले असे त्या रक्षकाचे सहकारी बोलत आहेत.
या रक्षकाने दुसऱ्याची जमीन बनावट कागदपत्रे तयार करून कवठ्याच्या महांकाळमधील एकाला विकली अशी चर्चा आहे. त्या बदल्यात त्या रक्षकाने संबंधित व्यक्तीकडून कोट्यवधी रुपये घेतले असे बोलले जात आहे. पैसे देऊनही जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यामुळे त्याने रक्षकासह अन्य काही लोकांविरुद्ध ग्रामीणकडे तक्रार अर्ज दिल्याचे समजते.
या अर्जाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. चौकशी करणाऱ्या संबंधित व्यक्तीलाही त्या रक्षकाला न वाचवण्यासाठी चांगलेच सूनवल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत त्या रक्षकासह अन्य लोकांवर कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.