"जन्मत: दुभंगलेला ओठ व टाकूचा मोफत उपचार” - डॉ वैभव पाटील.
दर सातशे अव्यंग मुलांच्या जन्मानंतर एक मुल असे जन्मते की त्याला एक किंवा दोन्ही बाजूला ओठ नसते कींवा काही मुलांमधे टाळूही तयार नसतो. असे जन्मतः दुभंगलेले ओठ आणि टाळू प्लॅस्टीक सर्जरीने चांगले तयार करता येतात. समाजाच्या सर्व घटकामधे हे व्यंग दिसून येते. काही गरीब घरामधे जन्मलेल्या मुलांच्या शस्त्रक्रियेचा पालक करू शकत नाहीत.
प्लॅस्टीक सर्जन डॉ. वैभव पाटील यानि सांगीतले की मिशन स्माईल आणी कोलगेट यांच्या सहकार्याने सुश्रुत प्लॅस्टीक आणि बर्नस हॉस्पीटल येथे जन्मतः दुभंगलेला ओठ आणी टाळूचा उपचार आणी शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. त्याचा फायदा गरजूनी घ्यावा. जेणे करून अशा सर्व मुलांना अव्यंग करता येईल. यासाठी सुश्रुत प्लॅस्टीक आणि बर्नस हॉस्पीटल येथे नोंदणी करावि कींवा ९१५८१९०९९९ या फोन वर संपर्क करावा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.