Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोथळी येथील वेश्या अड्डा उध्वस्त

कोथळी येथील वेश्या अड्डा उध्वस्त


करवीर तालुक्यातील कोथळीतील राधानगरी रस्त्यावरील वैभव लॉजिंग बोर्डिंगमध्ये चालणारा वेश्या अड्डा उध्वस्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणनचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी पीडित महिलेची सुटका करून पथकाने दोघांना अटक केली.

साताप्पा पाटील (रा. आवळी बुद्रुक, ता. राधानगरी), संदीप आंबोले (माद्याळ, ता. कागल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. लॉजमधून रोकडसह 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे निरीक्षक गोर्ले यांनी सांगितले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने बुधवारी रात्री उशिरा संयुक्तपणे कारवाई केली. राधानगरी रोडवरील वैभव लॉजिंग बोर्डिंगमध्ये अलीकडच्या काळात वेश्या अड्डा चालविला जात असल्याची परिसरात चर्चा होती.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गोर्ले व सहायक  निरीक्षक श्रद्धा आंबले यांना कारवाईच्या सूचना दिल्या.त्यानंतर पथकाने छापा टाकून कारवाई केली. कारवाईवेळी लॉजवर शरीरविक्रयास एका पीडित महिलेला आणून ठेवल्याचे निदर्शनास आले महिलेची सुटका करून दोघांना अटक करण्यात आल्याचेही गोर्ले यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.