पुण्यात तस्कराकडून 'म्याव म्याव' जप्त
पुणे : थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी 'म्याव म्याव' (मेफेड्रॉन) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने अटक केली आहे. या तस्कराला स्टेशन परिसरातून 11 लाख रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. धीरज कांबळे असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. तो येरवडा भागात राहायला आहे. त्याच्याकडून 10 लाखाहून अधिक रकमेचे 53.08 ग्रॅम 'एम डी' (मेफेड्रॉन) हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. मेफेड्रॉन हे अमली पदार्थ औषधी कॅप्सुलच्या स्वरूपात येतो. तसेच तरुणाई मध्ये या अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
विशेषतः पार्टी मध्ये या अमली पदार्थाचे सेवन केलं जाते. पाट्र्यांमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात आणि हे अमली पदार्थ सेवन केल्यानंतर तरुणाईला याची झिंग चढते. अंमली पदार्थांच्या तस्करीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.