पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीकरांच्या सेवेसाठी शनिवारी उघडणार ‘यशोधन’ : आरोय शिबीरे, रक्तदान, अन्नदान, शैक्षणिक साहित्य वाटप असा सामाजिक उपक्रमांचा होणार सप्ताह साजरा.
सांगली शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.पृथ्वीराजबाबा पाटील यांचा शनिवार दि.३१ डिसेंबर रोजी वाढदिवस असून यानिमित्त सामाजिक उपक्रमांचा सप्ताह साजरा होणार आहे.
सांगलीकरांना विविध सेवा प्रशासकीय दाखले आणि सुविधांसाठी पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या ‘‘यशोधन’’ या सेवा व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यालयात प्रशासकीय सेवेशी संबंधित विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने सांगलीकरांच्या सेवेसाठी ‘यशोधन’ उघडणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पृथ्वीराज पाटील फौंडेशनसह विविध संस्था संघटनांच्यावतीने संपूर्ण आठवडाभर सांगली विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी आरोग्य शिबीरे, रक्तदान, अन्नदान, शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध कार्यक्रम होणार आहे.
पृथ्वीराज पाटील नेहमची उत्साहाने सांगलीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. महापूराच्या जल संकटात त्यांनी स्वत: पाण्यात उतरून लोकांना मदतीचा हात दिला. कोरोनाच्या महाभयंकर संकटाता अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक असणार्या आरोग्य सुविधा पुरविण्याचे कार्य त्यांनी केले. नागरीकांची सेवा हेच आपले जगण्याचे उद्दीष्ट ठरविलेल्या पृथ्वीराज पाटील यांचा शनिवार दि. ३१ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांच्याहस्ते सांगलीकरांच्या सदैव सेवेसाठी ‘यशोधन’ या जनसंपर्क व सेवा कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ते चांणी चौक रोड या दरम्यान हे कार्यालय अगदी मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांना सोयीचे होणार आहे. यावेळी कॉंग्रेसचे जत विधानसभा मतदार संघाचे आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
या सेवा व संपर्क कार्यालयातून आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान नोंदणी, विवध प्रकारचे शासकीय दाखले अशा सुविधा देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी येथून विशेष सहकार्य केले जाणार आहे. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी पृथ्वीराज पाटील फौंडेशन सह विविध संस्थांच्या वतीनेआठवडाभर विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत. पुष्प, हार अथवा गुच्छ न आणता शुभेच्छा देण्यासाठी येणार्या नागरिकांनी वह्या घेऊन यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. आरोग्य शिबीरे, फिजिओ थेरपी शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, बेघरांना अन्नदान, रक्तदान, अनाथाश्रमात अन्नदान, बेघर व उघड्यावर राहणार्या लोकांना शाल वाटप, रक्तदान शिबीर, दारू नको दुध प्या हा उपक्रम, पद्मभुषण वसंतरावदादा पाटील शासकीय रूग्णालयात औषध वाटप, रूग्णांना फळ वाटप असे विविध उपक्रम होणार आहेत. पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतील एक लाख वृक्ष लागडीच्या उपक्रमांतर्गत रोप वाटप असे लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.