ग्राहकावरून बारबालांमध्ये मारामारी..
ही मारहाण एवढी भयानक होती की, एका बारबाला इतर तीन बारबालांविरोधात पोलीसात जावे लागले. अखेर पोलीसांनीही या घडलेल्या प्रकाराबाबत थेट गुन्हा नोंदविला. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुनलाईट या लेडीज सव्र्हस बारमध्ये एका गि-हाईक पैशांची उधळण करत होता. मात्र काही वेळाने त्याने पैसे वाटण्याचे अचानक थांबवले. अश्विनी (नाव बदललेले आहे) त्यावेळी गायनाच्या मजल्यावरुन मुनलाईट हॉटेलमध्ये गात होती. अश्विनीचे गायन संपले आणि ती मेकअप खोलीत आरामासाठी गेली. यावेळी या खोलीत असणा-या रुक्साना, सोनम आणि आरोही (पुर्ण नाव माहित नाही) या तीनही महिला वेटरने मिळून अश्विनीला मारहाण केली.
ग्राहक पैसे देण्यास तयार असताना अश्विनीने पैसे न देण्याचा सल्ला का दिला होता. याचाच राग आल्याने अश्विनीचा चेहरा या तीघींनी नखांनी ओरबडला तसेच रुक्साना हीने तिच्या बोटाला चावा घेतला. या झटापटीत अश्विनीची सोनसाखळी तुटली. या प्रकाराची तक्रार रात्री साडेतीन वाजता पनवेल शहर पोलीस ठाण्यात अश्विनीने दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.