प्रेमविवाहाच्या रागातून..
सांगली : प्रेमविवाहच्या राग मनात धरुन दोघांनी गावभागातील डेकोरेशन करणाऱ्या युवकास मारहाण केल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत दिग्वीजय राजू वराळे (वय ३२ रा. गावभाग सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संशयीत सुशांत महादेव गवळी आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले, की दिग्वीजय वराळे यांचा परिचय असणारा संशयीत सुशांत गवळी हा अन्य एकास घेवून मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरी आला. त्यांनी अलोक हेमानी याने केलेल्या प्रेमविवाहाच्या कारणावरुन फिर्यादीच्या घरात घुसून शिवीगाळ करुन दमदाटी केली. या प्रकारामुळे घरातील सर्वजण जागे झाले असता सुशांत याने फिर्यादी दिग्वीजय यास घराबाहेरील पॅसेजमध्ये नेऊन तेथील झाडाची कुंडी फोडली. तसेच त्याचा एक तुकडा सुशांत यांच्या वडिलांना फेकून मारला यामध्ये वडिल जखमी झाले. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.