Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहुल गांधींच्या जिवाला धोका?

राहुल गांधींच्या जिवाला धोका?


कन्याकुमारीहून निघालेली राहुल गांधींचा भारत जोडो यात्रा राजधानी दिल्लीत येवून ठेपली आहे. राहुल गांधींचं लाल किल्ल्यावरील भाषण, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी नंतर येत्या ३ जानेवारी पासून भआरत जोडो यात्रा आता पुन्हा एकदा कश्मिरी गेट येथून कश्मिरच्या दिशेने रवाना होणार आहे.

भारत जोडो यात्रेच्या अगदी दक्षिण भारत ते उत्तर भारत या प्रवासा दरम्यान विविध दिग्दज या यात्रेत सहभागी झाले. देशातील जनतेकडून यात्रेस उत्तम प्रतिसाद मिळाला. पण आता अचनक या यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या जीवाला धोका असण्याच्या चर्चेला उधाण आलं आले. किंबहुना या प्रकारची शक्यता खुद्द कॉंग्रेस पक्षाकडून दर्शवण्यात आली आहे. तरी राहुल यांच्या जीवाला नेमका कुणापासून धोका असु शकतो या चर्चेंणा देशाच्या राजकारणात उधाण आलं आहे. तरी याबाबत एक पत्रक जारी करत खुद्द कॉंग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बाबत माहिती दिली आहे.

 

कॉंग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहण्यात आलं आहे ज्यात नमूद केलं आहे की काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून "राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेत सहभागी होणार्‍या सर्व भारत यात्री आणि नेत्यांची सुरक्षेची जबाबदारी घ्यावी तसेच याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेसकडून अमित शाहकडे करण्यात आली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणाबाबत काँग्रेसने गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या पत्राव्दारे केंद्रीय गृहमंत्र्यांना काँग्रेसकडून तक्रार करण्यात आला आहे. तसेच यापुढे पंजाब आणि जम्मू काश्मीर सारख्या संवेदनशील भागातून ही यात्रा जात असल्याने खबरदारी घेण्यासंदर्भात विनंती या पत्राव्दारे करण्यात आली आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.