मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-वंचितची युती
मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती आता अंतिम टप्प्यात आली आहे. याबद्दल खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली असून आगामी मुंबई महापालिका एकत्रित लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. "वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेमध्ये बोलणी झाली आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी एकत्र जाण्याचा निर्णय झाला", अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सहभागाबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकींसाठी आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जायला तयार आहोत.
पण, आम्हलासोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उघड विरोध आहे. तर काँग्रेसचा छुपा विरोध असल्याची माहिती आम्हाला सुत्रांकडून मिळाली असल्यचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. शिवसेनला निर्णय घ्यावा लागेल, हे महापालिका निवडणुकांपरतं बोलतोय. काँग्रेस शिवसेनेसोबत येते का? हे पाहवं लागेल. पुणे आणि पिपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला सोबत घेतात का? हे बघावं लागेल, असंही आंबेडकरांनी सांगितले. 83 जागांवर निवडणूक लढाईची तयारी : प्रकाश आंबेडकर मुंबई महापालिका निवडणुकीत 83 जागांवर लढाईची तयारी आम्ही या चर्चेआधी केली होती.
आता सेना जेवढ्या जागा सोडेल तेवढ्या आम्ही लढवू, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरुन भाजपला सवाल दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरही प्रकार आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपवाल्यांना मला एकच प्रश्न आहे की त्यांचा पंथ काय होता? हे त्यांनी सांगावं. तुम्ही छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मरक्षक म्हणत असाल तर त्यांचा पंथ सांगा? असा सवाल आंबेडकर यांनी भाजपला केला आहे. उद्धव ठाकरे हे किती लवकर देशातील सर्व विरोधकांना, जे अँटी मोदी आहेत. त्यांना एकत्र घेऊन चर्चा करतात ते बघावं लागेल.
काँग्रेसमध्ये धमक राहिलेली नाही, त्यांच्याकडे नेते नाहीत. ते मोदींना अंगावर घेऊ शकत नाहीत. काँग्रेसकडे लीडरशीप नाही, त्यामुळे काँग्रेसला पर्याय तयार करावा लागेल, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.