Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील वीज कर्मचारी उद्या संपावर: वीज कर्मचारी संपावर जाण्यामागील कारण आहे तरी काय?

राज्यातील वीज कर्मचारी उद्या संपावर: वीज कर्मचारी संपावर जाण्यामागील कारण आहे तरी काय?


मुंबई : आज मध्यरात्री पासून राज्यातील वीज कर्मचारी हे संपावर जाणार आहे. वीज अधिकारी, कर्मचारी यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे येथे हजारो कामगारांनी आंदोलन केले होते. वीज कंपन्यांचे खाजगीकरण होऊ नये या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. त्यादरम्यान यावर कुठलाही निर्णय न झाल्यास थेट संप केला जाईल असा इशारा वीज कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने याबाबत कुठलीही भूमिका न दर्शविल्याने वीज कर्मचारी संघटनांनी याबाबत विरोध दर्शवत आज मध्यरात्री पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

72 तासांचा हा संप केला जाणार असून यामध्ये राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहे. वीज कंपन्यांच्या जवळपास 30 संघटनांनी यामध्ये पाठिंबा दिला असून सरकारने खाजगीकरन करू नये अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे. आज मध्यरात्री म्हणजेच 03 जानेवारीच्या रात्री 12 वाजेनंतर 72 तासासाठी हे सर्व कर्मचारी संप करणार आहे. यावेळी कर्मचारी कर्तव्यावर हजर राहणार नाही. त्यामुळे संपा दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील नागरिक चिंतेत आहे.

राज्यातील वीज कंपन्यांचे खाजगीकरण केले जाणार आहे. अदानी ग्रुपसोबत करार करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती कामगारांना मिळाल्याने त्यांनी त्यास विरोध सुरू केला आहे. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेशान कंपनीचा यामध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ठाणे येथे एकत्र येत सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला होता.

तिन्हीही वीज कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी या संपात सहभागी होणार आहे. यामध्ये सरकारने करार करू नये या मागणीसाठी 30 संघटना एकत्र आल्या असून त्यानी विरोध दर्शविला आहे. संपाचा इशारा देऊनही सरकारने अद्याप याबाबत कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

72 तासांच्या संपात सरकारने निर्णय मागे घेतला नाहीतर बेमुदत संप पुकारण्याची हालचाल वीज कंपन्यांचे कर्मचारी करीत आहे. त्यामुळे येत्या काळात सरकारची भूमिका महत्वाची असणार आहे. वेळीच सरकारने निर्णय घेतला नाहीतर वीज कर्मचारी खाजगीकरणाच्या मुद्दावरुन अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांसारखा संप पेटणार नाही याची खबरदारी सरकारला घ्यावी लागणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.