14 टक्के कुटुंबांनी टोमॅटो खाणे सोडले
बाजारात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो टोमॅटोसाठी 150 ते 160 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे 14 टक्के कुटुंबांनी टोमॅटो खाणे सोडून दिले आहे, तर 46 टक्के कुटुंबांनी एक किलो टोमॅटोसाठी 150 रुपये मोजले आहेत, अशी बाब 'लोकल सर्कल'च्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. सामान्यांसाठी हा महागाईचा 'रेड सिग्नल' ठरला आहे.
300 टक्क्यांपर्यंत वाढ
अवघ्या 20 ते 40 रुपये किलो दराने मिळणाऱया टोमॅटोनी आता शंभरी ओलांडली आहे. टोमॅटोच्या किमतीत गेल्या महिनाभरात म्हणजेच अवघ्या 30 दिवसांत 300 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहे.
पाव किलो पुरेसे
टोमॅटो आणि कांदा हे रोजच्या जेवणात हमखास लागतात. बाजारात गेल्यानंतर एक किलो किंवा दोन किलो टोमॅटो खरेदी करणारी व्यक्ती आता फक्त पाव किलो किंवा अर्धा किलो टोमॅटो खरेदी करीत आहे, असे टोमॅटो विक्रेते सांगत आहेत.
सर्व्हेनुसार 68 टक्के कुटुंबांनी आपल्या जेवणातील भाज्यांमध्ये याचा वापर कमी केला आहे. चांगली गुणवत्ता असलेल्या टोमॅटोसाठी दोनशेहून अधिक रुपये मोजावे लागत आहेत. या सर्व्हेत हिंदुस्थानातील 342 जिह्यांतील 22 हजारांहून अधिक नागरिकांच्या प्रतिक्रिया विचारात घेतल्या गेल्या आहेत. यात 65 टक्के पुरुष तर 35 टक्के महिलांचा समावेश होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
