🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विदर्भकन्या 'इस्रो' शास्त्रज्ञ माधवी ठाकरे ठरल्या ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार!

विदर्भकन्या 'इस्रो' शास्त्रज्ञ माधवी ठाकरे ठरल्या ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार!

आजच्या अत्याधुनिक युगात भारत सर्वच क्षेत्रात उत्तुंग झेप घेत आहे. यामुळे साच्या जगालाही भारताचा अभिमान वाटतो. शुक्रवारी असाच एक ऐतिहासिक, प्रत्येक भारतीयांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेल्या चांद्रयान- ३ चे औहरिकोटा येवून यशस्वी 'लॉन्चिंग' झाले. अत्यंत कमी वयात गेल्या १३ वर्षांपासून 'इस्रो' अंतराळ संशोधन संस्था अहमदाबाद येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत, 'मूर्तिजापूरची लेक' माधवी विजय फुके तवा नागपूरच्या स्नुशा माधवी सचिन ठाकरे यांनीदेखील श्रीहरिकोटा येथे सहभागी होत आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. केवळ भारतवर्षच नव्हे तर जागतिक ऐतिहासिक क्षणाच्या विदर्भकन्या माधवी ठाकरे साक्षीदार ठरल्या आहेत. सदर बाब वैदर्भीयच नव्हे तर देशवासीयांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.

दरम्यान, अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञ माधवी ठाकरे यांनी आतापर्यंत चांद्रयान २ मार्स ऑर्बिटर मिशन, रिसोर्ससॅट-२ ए (आर), भारतीय नॅनोसॅटलाइट, मिशन १ ए २ बी ३ सी स्पेस डॉकिंग प्रयोग, रिसोर्ससॅट -३ व चांद्रयान -३ अशा कितीतरी महत्त्वपूर्ण असणाऱ्या मिशन भारतीय मध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. अगदी ग्रामीण भागातून येत दहावीपर्यंत मराठी भाषेत शिक्षण घेत कुटुंबातील संस्कार, डॉक्टर, इंजिनिअर, विधी अशा क्षेत्राची भुरळ न पडता वेगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेण्याचं व शास्त्रज्ञ होण्याचं पाहिलेल स्वप्न त्यानी जिद्द आणि चिकाटीने पूर्ण करीत वेगळी वाट चोखंदळीत आजच्या तरुणाईसमोर एक नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. दरम्यान, अमरावती येथे इंजिनिअरिंगसाठी नंबर लागल्यानंतरदेखील तिकडे न जाता त्यांनी विज्ञान शाखा निवडली. अकोल्याच्या आरएलटी विज्ञान महाविद्यालयातून बीएस्सी 'फिजिक्स' विषयात उत्कृष्टरीत्या पदवी घेतली. यानंतर शास्त्रज्ञ माचवी ठाकरे यांनी पुणे विद्यापीठातून 'पीएचडी' केल्यानंतर काही तरी वेगळे करून दाखविण्याचा आजच्या तरुणाईसमोर एक नवा आदर्श त्यांनी निर्माण त्यांचा ध्यास होता. अशात त्यांना नीलिमा मॅडम यांचे केला आहे. दरम्यान, अमरावती येथे इंजिनिअरिंगसाठी मार्गदर्शन लाभले. २०१० मध्ये 'इस्रो' ची परीक्षा उत्तीर्ण होत एका वेगळ्या क्षेत्रात या विदर्भकन्येने पाऊल ठेवले. सन २०११ मध्ये नागपूरच्या सचिन ठाकरे यांचेशी विवाहबद्ध होत संसाराची जबाबदारीसुद्धा त्या लीलया पेलत आहेत.

विशेष म्हणजे अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञासारख्या एवढ्या जबाबदारीच्या नोकरीत घरची सर्व कामे स्वतः करण्याचे कटाक्षाने पाळतात. परिस्थितीची जाण, कुटुंबाचे संस्कार व जिद्द या बळावर त्यांनी उत्तुंग भरारी घेतली असून, त्यांचा हा थक्क करणारा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.