🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

3 वर्षांच्या मुलाच्या पापण्यामध्ये उवानी केले घर , डॉक्टरही पडले बुचकळ्यात

3 वर्षांच्या मुलाच्या पापण्यामध्ये  उवानी  केले घर , डॉक्टरही पडले बुचकळ्यात 


चीनमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका तीन वर्षाच्या मुलाच्या पापण्यांमध्ये असे काही आढळले की डॉक्टरही हादरले. त्यांच्या पापण्यांमध्ये चक्क डोक्यातल्या उवांनी घर केले होते. अमेरिकन जर्नल ऑफ ऑप्थाल्मोलॉजी केस रिपोर्ट्सच्या सप्टेंबरच्या आवृत्तीत 'अत्यंत दुर्मिळ' केस म्हणून प्रकाशित झाले आहे.
या मुलाच्या पापण्यांना सारखी खाज यायची. पापण्या दुखायच्या, वेदना व्हायच्या आणि त्यानंतर डोळे सूजायचे. नेमके असे का होतेय हे जाणून घेण्यासाठी त्याच्या पालकांनी मुलाला नेत्ररोग तज्ज्ञाकडे नेले. तिथे त्याची तपासणी केली असता डॉक्टरही हादरले. त्याच्या डोळ्यांवर चक्क डोक्यातील उवांनी घर केले होते, अंडी बाळाच्या पापण्यांवर चिकटली होती. अमेरिकन जर्नल ऑफ ऑप्थाल्मोलॉजी केस रिपोर्ट्सच्या सप्टेंबरच्या आवृत्तीत 'अत्यंत दुर्मिळ' केस म्हणून प्रकाशित झाले आहे. डोळ्यांच्या तपासणीत मुलाच्या उजव्या डोळ्याच्या वरच्या पापणींच्या मुळाशी मोठ्या प्रमाणात उवा फिरताना दिसल्या.या सगळ्या डोक्यातील उवा असल्याचे डॉक्टरांच्या निरीक्षणात आल्याचे अहवालात म्हंटले आहे. झेंग्झू येथील रहिवासी असलेल्या या मुलाला वाळूमध्ये खेळायला आवडायच आणि अनेकदा त्याच हाताने तो डोळे चोळायचा. सुदैवाने त्याच्या दृष्टीवर काही परिणाम झाला नाही, उवा आणि त्यांची अंडी काढून टाकल्यानंतर, त्याचा डोळ्याचा त्रास पूर्णपणे बरा झाला. त्यासाठी त्याला मलम आणि आयड्रॉप देण्यात आले.
अहवालानुसार, संक्रमित पापण्या, डोक्याच्या उवा आणि लिका काढून टाकल्यानंतर आम्ही आयोडीन संयुग जंतुनाशक कॉटन ब्रशने पापणीच्या काठाचे निर्जंतुकीकरण केले. ' असे अहवालात स्पष्ट केले आहे. उवा, लिका आणि पापण्यांवर जमा झालेला घट्ट स्त्राव काढून टाकल्यानंतर, त्याच्या डोळ्याला होणारा त्रास बरा झाला. मेयो क्लिनिकच्या मते, उवा हे लहान, पंख नसलेले कीटक आहेत जे मानवी रक्त पितात. जवळच्या संपर्कातून उवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतात. योग्य उपचार न केल्यास, उवांची वारंवार होणारी समस्या होऊ शकते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.