🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधान मोदींच्या 5 वर्षातील परदेश दौऱ्यांचा खर्च करोडोंच्या घरात

पंतप्रधान मोदींच्या 5 वर्षातील परदेश दौऱ्यांचा खर्च करोडोंच्या घरात

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षात अनेक परदेश दौरे केले आहेत. अनेकदा त्यांच्या या परदेश दौऱ्यावरून त्यांच्यावर टीकाही केली जाते. मात्र त्यांच्या परराष्ट्र दौऱ्याच्या खर्चाची माहिती बुधवारी राज्यसभेत देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत जगातील 71 देशांचा परराष्ट्र दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या दौऱ्यासाठी एकूण 254.87 कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती आज परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

राज्यसभेत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर 2,54,87,01,373 रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले आहे. 21 फेब्रुवारी 2019 ते 16 नोव्हेंबर 2022 यादरम्यान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 22 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांच्या परदेश दौऱ्यांवर झालेल्या खर्चाबाबत राज्यसभेत लेखी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना राष्ट्रपतींच्या दौऱ्यांसाठी केंद्र सरकारने तब्बल 6,24,31,424 रुपये खर्च केले होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यांसाठी 22,76,76,934 रुपये आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यांसाठी 20,87,01,475 रुपये खर्च केल्याची माहिती मुरलीधरन यांनी दिली आहे.

दरम्यान, मोदींच्या सतत होणाऱ्या परदेश दौऱ्यांवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र त्याकडे लक्ष न देता ते विविध देशात जाऊन मैत्रीचे नाते वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच विविध कार्यक्रम आणि परिषदांसाठीही ते परदेश दौरे करत आहेत. परदेशातील दौऱ्यांमध्ये तेथील लोकांचाही मोदींना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.