🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अल्पवयीन मुलीला व शिक्षकाला विवस्त्र करून बेदम मारहाण

अल्पवयीन मुलीला व शिक्षकाला विवस्त्र करून बेदम मारहाण

बिहार मधील बेगुसराई येथे एका अल्पवयीन मुलीची आणि मध्यवयीन पुरूषाची विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलगी आणि पुरूष आक्षेपार्ह स्थितीत असताना या इसमांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी पीडित मुलगी व त्या पुरूषाला विवस्त्र करत मारले. आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करण्याचे धाडसदेखील केले.

मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली आहे. हा पुरूष संगीत शिक्षक असून, अंदाजे चाळीशीतला असल्याचे समजते. याप्रकरणी शिक्षकावर पोक्सो कायदा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा, माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 67 बी आणि आयपीसी कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेंद्र कुमार यांनी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी आणखी आठ जणांवर ताब्यात घेतले आहे. तसेच अल्पवयीन मुलीवर व शिक्षकावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. पोलिस सध्या व्हिडिओची तपासणी करत आहेत. मुलगी आणि शिक्षक यांचे कपडे घटनास्थळावरून गोळा करून फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेच्या तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.