Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा बँकेच्या कामकाजात अनियमितता , चौकशी समितीचे ताशेरे

जिल्हा बँकेच्या कामकाजात अनियमितता , चौकशी समितीचे ताशेरे 


सागंली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जिल्हा बँकेतील मागील संचालक मंडळाच्या कार्यकालामध्ये कर्जवाटप, नोकरभरती, इमारत बांधकाम, एटीएम मशिन खरेदीमध्ये अनियमितता आढळून आल्याचा ठपका चौकशी समितीच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.
तत्कालिन संचालक, अधिकार्‍यांकडून याची वसुली करण्याची शिफारस चौकशी समितीने सहकार आयुक्तांना दिलेल्या अहवालात केली आहे.मागील सहा वर्षाच्या कालावधीत बँकेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत तत्कालिन संचालक तथा विद्यमान अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक आणि स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाच सदस्यांची समिती नियुक्त केली होती. मात्र, या चौकशी समितीला स्थगितीही त्याचवेळी देण्यात आली. मात्र, राज्यात सत्ताबदल होताच आ. गोपीचंद पडळकर यांच्या मागणीनंतर चौकशी समितीची स्थगिती उठविण्यात आली.

चौकशी समितीने आता आपला अहवाल सहकार आयुयतांना सादर केला असून या अहवालात विविध मुद्दयाबाबत गंभीर ताशेरे नोंदवले आहेत. केन अ‍ॅग्रो, वसंतदादा, स्वप्नपूर्ती साखर कारखाना, डिव्हाईन फूडस, गोपूज साखर कारखाना यांना करण्यात आलेला नियमबाह्य कर्जपुरवठा, बँकेने ताब्यात घेतलेल्या सहकारी संस्था यामध्ये गैरव्यवहार आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.तसेच बँक इमारत नूतनीकरणामध्ये अवास्तव खर्च करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले असून बेँकेने केलेल्या प्रसिध्दी खर्चावरही आक्षेप घेण्यात आले आहेत. तसेच नोकरभरतीमध्ये अनियमितता आढळून येत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

ज्या वेळी बँकेत अनियमितता आढळून आली त्यावेळी बँकेत राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांच्या गटाचे बहुसंख्य संचालक होते. तर आ. पाटील यांचे निकटवर्तिय दिलीप पाटील हे अध्यक्ष होते. आताही बँकेत आ. पाटील यांच्या गटाचेच वर्चस्व आहे.या अहवालाबाबत अधिकृत माहिती अद्याप आपणाकडे आलेली नाही, यामुळे चौकशी समितीच्या अहवालातील आक्षेपाबाबत आताच बोलणे उचित होणार नाही – अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक.चौकशी समितीने तत्कालिन संचालक मंडळाच्या कारभाराबाबत गंभीर ताशेरे अहवालात ओढले असून केवळ गैरव्यवहारातील पैशाची वसुली करण्याऐवजी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करायला हवेत- सुनील फराटे, जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.