संभाजी भिडेच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली,' 'शिवप्रतिष्ठान ' आपल्या भूमिकेवर ठाम
श्री शिवप्रिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत. भिडे यांचा दाेन दिवसीय दाैरा वादग्रस्त ठरणार की काय अशी चिन्ह निर्माण झालीत. आज भिडे यांची हदगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु भिडे हे वादग्रस्त वक्तव्य करतात त्यामुळे त्यांच्या हदगाव येथील सभेला पोलिसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने करण्यात आली होती. अन्यथा भीम टायगर सेना सभा उधळून लावणार असा इशारा देखील भीम टायगर सेनेचे अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी दिला होता.
दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी (नांदेड )संभाजी भिडे यांच्या हदगाव येथील सभेला परवानगी नाकारली. दरम्यान या सभेला परवानगी नाकारली असली तरी छोटेखानी सभा घेण्यावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते ठाम राहिले आहेत. त्यामुळे भिडे यांचा दाेन दिवसीय नांदेड जिल्ह्यातील दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान संभाजी भिडे यांनी या पुढे वादग्रस्त आणि जातीवादी वक्तव्य केल्यास त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ असा इशारा भीम टायगर सेनेचे अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.