कर्करोगांवरील औषधे स्वस्त होणार, जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय.
नवी दिल्ली : कर्करोगांबाबत एक मोठी व महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता कर्करोगांवरील औषधे स्वस्त होणार आहेत. जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेची ५० वी बैठक मंगळवारी नवी दिल्लीत पार पडली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. सीतारामन यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. या निर्णयामुळं कर्करुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, ही औषधं खूप महाग असतात. आता ही औषधं स्वस्त होणार असल्यामुळं रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्करोगाच्या औषधांवर IGST लागू नाही
दरम्यान, याशिवाय आता आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर IGST लागू होणार नाही. जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी न्यायाधिकरणाच्या स्थापनेलाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळं ही औषधे स्वस्त होणार आहेत. आता कर्करोगांवरील औषधे स्वस्त होणार आहेत. जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सिनेमा हॉलमधील खाण्यापिण्याच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेने सिनेमा हॉलमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरील कर कमी करून ५ टक्के केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
