कर्मवीर पतसंस्थेने नेत्रदिपक कार्य केले:- मा. आमदार प्रा. शरद पाटील कॉलेज कॉर्नर, सांगली शाखेचे उद्घाटन
सांगली :- कर्मवीर पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे. पतसंस्था क्षेत्रात कर्मवीर पतसंस्था महाराष्ट्रात नामांकीत ठरलेली आहे. संस्थेने सभासदांचा विश्वास प्राप्त केला आहे. असे गौरवोद्गार माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी काढले. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या कॉलेज कॉर्नर सांगली शाखेचे उद्घाटन त्यांच्या अमृतहस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
स्वागत प्रास्ताविकात संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला . संस्थेच्या ठेवी ९१५ कोटी असून संस्थेने रु. ६७० कोटीचे कर्ज वितरण केले आहे. ६० शाखेतून संस्था ऑनलाईन कोअर बँकींग सेवा देत आहे. भागभांडवल ३० कोटी ३० लाख स्वनिधी रु.८६ कोटी आहे... गुंतवणुक ३७८ कोटी आहे. संस्थेच्या एकूण व्यवसायाची वाटचाल रु. २००० कोटी कडे सुरु आहे.ज्या संस्था नियोजनबध्द कामकाज करीत आहेत त्यांना कोणतीही अडचण नाही. पतसंस्थेने ९०० कोटीहुन अधिक ठेवी जमविणे हा उच्चांक असून कर्मवीर पतसंस्थेने पतसंस्था क्षेत्रातच काम करावे कारण तेथे काम करण्यास चांगला वाव व संधी आहे. संचालकांचे नियोजन आणि सेवकांची सेवावृत्ती या मुळे संस्था यशस्वी होतात. त्यामुळेच कर्मवीर पतसंस्थेने सर्वच बाबतीत उल्लेखनिय कार्य केले असल्याचे प्रा. शरद पाटील म्हणाले. कर्मवीर आण्णांच्या विचाराने काम करीत असताना कर्मवीर आण्णांच्या शैक्षणिक कार्यासाठी शिष्यवृत्ती किंवा शैक्षणिक कर्ज या सुविधा संस्थेने सुरु कराव्यात अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणुन माजी महापौर मा. सुरेश पाटील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. शांतीनाथ कांते. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे ऑनररी सेक्रेटरी श्री. सुहास पाटील. एज्युकेशन कमिटी मेंबर श्री. उदय पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे ट्रस्टी श्री. शांतीनाथ नंदगांवे यांचे सह सल्लागार श्री. सुहास मगदुम सुभाष मादनाईक भुपाल देसाई यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक अॅड. एस. पी. मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ओ. के. चौगुले (नाना), डॉ. एस. बी. पाटील (मोटके) संचालिका श्री. भारती आप्पासाहेब चोपडे, सौ. चंदन नरेंद्र केटकाळे तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे श्री. लालासो भाऊसो थोटे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांच्यासह शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी संस्थेचे सभासद 1. सेवक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे संचालक श्री. वसंतराव धुलाप्पाण्णा नवले यांनी मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
