🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"किरीट सोमय्या हे माझे वडील आहे, हे सांगण्याची हिंमत मुलामध्ये नाही.'; ठाकरे गटाच्या 'या' नेत्याचं विधान चर्चेत

"किरीट सोमय्या हे माझे वडील आहे, हे सांगण्याची हिंमत मुलामध्ये नाही.'; ठाकरे गटाच्या 'या' नेत्याचं विधान चर्चेत

मुंबई: भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्यांचा दोन दिवसांपूर्वी एक अश्‍लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोमय्या यांच्या या व्हिडीओनंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहे. यानंतर याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी या व्हिडीओवरून जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणाबाबत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना “किरीट सोमय्या हे आपल्या कुटुंबाच्या आणि मुलाच्या नजरेतून उतरले आहेत’. असं म्हंटलं आहे. नितीन देशमुख म्हणाले की, “किरीट सोमय्यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. तो एक नालायक आणि पिसाळलेला माणूस आहे.

किरीट सोमय्यांनी अनेकांच्या मागे ईडीची चौकशी लावली. आमच्यामागेही 'अँटी करप्शन' विभागाची चौकशी लावली. पण आम्ही जेव्हा चौकशीला जायचो, तेव्हा आमच्या कुटुंबाने आणि आमच्या पत्नीने टिळा लावून आमचं स्वागत केलं. त्यानंतर आम्ही चौकशीला हजर राहिलो.

पण आजची किरीट सोमय्यांची घरची परिस्थिती वेगळी आहे. किरीट सोमय्या हे माझे वडील आहेत, असं सांगण्याची हिंमत त्यांची मुलं करत नाहीयेत. ते आपल्या कुटुंबाच्या आणि मुलाच्या नजरेतून उतरले आहेत. एवढं नीच कृत्य त्यांनी केलं आहे…’ अशी तिखट प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली.

फडणवीस म्हणाले की, जो विषय मांडला आहे तो गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. माझे म्हणणे आहे की माझ्याकडे पुरावे द्या. कोणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कुठलेही प्रकरण दाबले जाणार नाही. सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी केली जाईल. असं ते म्हणाले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.