तुमच्या मुलांना चहा आवडतो? अजिबात देऊ नका!
चहा आवडत नाही असा व्यक्ती तुम्हाला विरळाच सापडेल. चहा प्यायल्याने थकवा, स्ट्रेस आणि झोप दूर होऊन फ्रेश वाटू लागत. त्यामुळे सकाळ संध्याकाळ तुम्हाला रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर चहा प्रेमींची गर्दी दिसते.
अनेकदा घरातील मोठ्या माणसांना पाहून लहान मुल देखील चहा पिण्याचा हट्ट करतात. तसेच मोठी माणसं देखील अनेकदा लहान मुलांना चहा बिस्कीट सारखे पदार्थ खाऊ घालतात. परंतु लहान मुलांना चहा देणं कितपत योग्य आहे? तसेच याचा त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊयात.
चहा आणि कॉफी यासारखे कॅफीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने लहान मुलांचे दात किडण्याची शक्यता असते. लहान मुलांच्या दातात कॅव्हिटी होऊ शकते. तेव्हा तज्ञांच्या मते 12 वर्षांखालील लहान मुलांना कॅफीनयुक्त पदार्थ देऊ नयेत, कारण याचा गंभीर परिणाम मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतो. अनेकदा पालक त्यांच्या लहान मुलांना चहासोबत बिस्कीट, टोस्ट सारखे पदार्थ खायला देतात आणि यामुळे मुलांना चहाची सवय लागते.
चहा कॉफी सारख्या पेयांमध्ये भरपूर प्रमाणात साखर आढळते. याचा शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. 12 ते 18 वयोगटातील मुलांनी 100 मिलिग्रॅम पेक्षा जास्त कॅफिनचे सेवन करू नये. सतत चहा कॉफी प्यायल्याने लहान मुलांची हाडे कमकुवत होतात. तसेच त्यांच्यामध्ये झोपेची कमतरता, चिडचिडेपणा, मधुमेह, डिहायड्रेशन , दाताला कीड लागणे आणि वजन वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. तेव्हा शक्यतो त्यांना चहा किंवा कॉफी देण टाळावे. त्याऐवजी मुलांना दूध किंवा हरबल चहा देणं फायदेशीर ठरू शकत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
