🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप पदाधिकाऱ्याचया पत्नीचा गोळीबारात मृत्यू

भाजप पदाधिकाऱ्याचया पत्नीचा गोळीबारात मृत्यू 


स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात शेजारील घरात आश्रयात गेलेल्या एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला होता. मात्र, गोळीबारात भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीला गोळी लागून ठार झाल्याची घटना रविवारी (दि.२४) रात्री साडेनऊच्या सुमारास् राजूरा शहरातील सोमनाथपूरा वार्डात घडली. तर आश्रयास गेलेला लल्ली शेरवील हा गोळीबारात जखमी झाला आहे. ठार झालेल्या महिलेचे नाव पूर्वशा सचिन डोहे असे आहे. ती राजूरा शहरातील सोमनाथपूरा वार्डातील रहिवासी होती.

जखमी लल्ली शेरवील आणि भाजयुमोचा पदाधिकारी सचिन डोहे शेजारी आहेत. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लल्ली शेरवीलवर त्याच्या घरी एका मारेकऱ्याने गोळीबार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र शेरवील हा जीव वाचवित कसाबसा पळून शेजारी सचिन डोहे यांचे घरी आश्रयास गेला. पळून जात असताना मारेकऱ्याने त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबार होत असल्याने सचिन डोहे यांची पत्नी ही घराबाहेर आली. शेरवीलवर झाडलेली गोळी थेट सचिन डोह यांची पत्नी पूर्वशा डोहे हिच्या छातीवर लागली आणि ती जागीच ठार झाली.

यावेळी तिचा पती सचिन हा घरी नव्हता. त्यानंतर चालविलल्या गोळीबारात शेरवील हा जखमी झाला आहे. जखमीला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेनंतर मारेकरी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. मारेकरी का एकटाच असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती राजूरा पोलिसाना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येत चोख पोलिस बंदोबस्त लावला. पसार झालेल्या आरोपीचा राजूरा पोलिस शेाध घेत आहेत. शेरवील याचा कोळसा तस्करीशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. कोळसा तस्करीच्या व्यवहारातून शेरवील याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात शेरवील शेजाऱ्या घरी घुसल्याने डोहे यांच्या पत्नीवर गोळी झाडून ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.