Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आजीबाई जोरात 92 वर्षी चालवतात कार ' या' आजीबाई

आजीबाई जोरात 92 वर्षी चालवतात कार ' या' आजीबाई 


डोंबिवली, 22 ऑगस्ट : वयाची साठी ओलांडली की निवृत्तीचे वेध लागतात. जास्तीत जास्त आराम करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. काही जणांना मात्र हे मान्य नसतं. ते या वयातही नव्या गोष्टी शिकतात. फक्त शिकत नाहीत तर तरुणांना लाजवेल या उत्साहानं ते कामात कौशल्य मिळवतात. ठाणे जिल्ह्यातल्या टिटवाळ्याच्या गंगाबाई मीरकुटे या देखील अशाच आजी आहेत. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी चारचाकी गाडी शिकली आणि आता 92 वर्षी देखील एखाद्या कुशल ड्रायव्हरसारखी गाडी चालवतात.कसा झाला प्रवास?अंबरनाथजवळच्या मोरीवली या गावात गंगाबाई यांचा जन्म झाला. घरातल्या एकुलती एक लेक असल्यानं माहेरी खूप लाड झाले असं त्या सांगतात.

वयाच्या 18 व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि त्या संसारात रमल्या. सासरच्या मोठ्या कुटुंबात मोठ्या सुनेची जबाबदारी आपण पार पाडली, असं त्यांनी सांगितलं.मिल कामगाराच्या मुलानं लावला वडापावचा शोध, बाळासाहेब ठाकरेंपासून सचिनपर्यंत सर्वांनीच चाखलीय चवनातवानं शिकवली गाडीमाझा नातू विकास यानं आपल्याला 90 व्या वर्षी गाडी शिकवली. नातसुनेचा वढदिवस होता. त्यावेळी गाडी घेऊन गावी गेलो होतो.

माझ्या नातवाने गाडी चालवते का असे विचारले मी हो म्हटले आणि गाडी हातात घेतलीआता गावी जायचं असेल तर मी स्वत: गाडी चालवते,' असं गंगाबाई यांनी सांगितलं. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघानं या कामगिरीसाठी त्यांचा 'कारनामा आत्मविश्वास सन्मानपत्र' देऊन गौरव केलाय.दहा बाय दहा जागेत शेती कराल तर चारचाकीत फिराल, लावा हे पीकफिटनेसचं रहस्यगंगाबाई आता 92 वर्षांच्या आहेत. या वयातही त्यांचा दिवस व्यस्त असतो. त्या सकाळी लवकर उठून योगा आणि देवपूजा करतात.

हरिपाठ वाचतात. एकट्या देवळात जातात आणि घरातील काम करण्यासाठी सूनेला मदत करतात. आम्ही शेतकरी असल्याने शेतात उडीद, तांदूळ, नाचणी या गोष्टी अधिक पिकवत होती. नाचणीची भाकरी, चटणी, भाजी, तांदुळाची भाकरी, भात हे सर्व आम्ही खत होतो. अजूनही मी भात आणि तांदूळ भाकरी भाजी सोबत खाते. बाहेरचा एकही पदार्थ मी खात नसल्याचं आजींनी सांगितलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.