Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पहा व्हायरल विडिओ. सांगलीतील प्रसिद्ध पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक कोणाचा धाकच राहिला नाही

पहा व्हायरल विडिओ. सांगलीतील प्रसिद्ध पेट्रोल पंपावर  ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक कोणाचा धाकच राहिला नाही

एकाच वेळी पेट्रोल न टाकता दोन टप्प्यात पेट्रोल टाकल्याचे दाखवून ग्राहकांना लुटायचा हा धंदा झुलेलाल चौक ते सिव्हिल हॉस्पिटल रोडवर असणाऱ्या पेट्रोल पंपावर काही दिवसांपासून सुरू आहे.  20 जुलैला पंधराशे रुपये चे तेल टाकायला सांगितले तर संबंधित महिला आधी पाचशेचे टाकतो व नंतर एक हजारचे टाकतो असे सांगते. पाचशेचे तेल टाकल्यानंतर पुन्हा पेट्रोल सोडण्याची पाईप पेट्रोलच्या मशीन जवळ नेऊन काहीतरी सेट केल्याचे दाखवत पुन्हा पेट्रोलची पाईप टाकीत सोडली. आधी टाकलेल्या पाचशे रुपयांपासूनच पुढे सलग तेल टाकले. हे करताना स्क्रीन वरती झिरो आकडा न आणता आहे त्या 500 पासूनच पुढे कंटिन्यू तेल टाकले. हजार रुपयांचा आकडा झाल्यानंतर तेल टाकायचे बंद केले व हे हजार आणि आधीचे पाचशे पंधराशे रुपये झाले असे सांगत 1500 रुपये मागितले. पण तुम्ही एकुण हजारचेच तेल टाकले आहे. पाचशेपासून पुढे सुरु ठेऊन हजार केले आहे असे सांगत जाब विचारला. त्यानंतर ऑनलाईन चेक करण्यास भाग पाडल्यानंतर तेल हजार रुपयाचेच टाकल्याचे लक्षात आले. काही तरी वेळ मारुन नेणारी उत्तरे देत त्यावेळेस संबंधित पेट्रोल पंपावरील व्यक्तीने (कदाचित मॅनेजर) विषय संपवला. हा सर्व प्रकार 20 जुलै 2023 ला माझ्या मुलासोबत झाला होता. गडबडीत असणारा ग्राहक आधी पाचशेचे टाकले होते आणि नंतर हजारचे टाकले असे समजून पंधराशे रुपये देऊन जातो. मात्र हे चालाक कर्मचारी 500 चे तेल टाकल्यानंतर पुन्हा तेल टाकताना 500 पासूनच कंटिन्यू करत असल्यामुळे एकूण 1000 रुपये तेल टाकतात.  मात्र ग्राहकाकडून पंधराशे रुपये उकळतात.(हजारचे तेल टाकून पंधराशे घेतात हा आकडा केवळ उदाहरणादाखल आहे.हजार, दोन हजारचे अथवा टाकी फुल्ल करतानाही असाच प्रकार करत किमान पाचशे रुपयांची चोरी करतात.) 

 आज सकाळी माझं वृत्तपत्र सेंटरवरील काम आवरून घरी येताना माझ्या ॲक्टिव्हा गाडीत तेल टाकायला या पंपावर थांबलो. त्यावेळेस संबधित महीलाच (जीने माझ्या मुलाशी वरील प्रकार केला होता तीच महीला होती) एका चार चाकीत (KA 14 M 9240 )  तेल टाकत होती. त्या गाडीवाल्याने टाकी फुल करा असे सांगूनही आधी पाचशेचे टाकतो व नंतर टाकी फुल करते असं त्या महिलेने गाडी वाड्याला सांगितले. या महिलेचा यापूर्वीचा अनुभव माहीत असल्याने संबंधित महीला कसं तेल टाकते, व्यवस्थित तेल टाकते की फसवणूक करते हे बघत उभारलो.

त्या ग्राहकाने ग्राहकाने टाकी फुल करा असं सांगितलं परंतु संबंधित महिलेने 500 चे तेल टाकल्यानंतर तेल टाकणे थांबवले आणि पाईप पुन्हा मशीन जवळ नेली. त्या गाडी चालकाला टाकी फुल करू काय असं उगीचच पुन्हा विचारत पंपाच्या मशीन जवळ काहीतरी सेटिंग केल्याचं नाटक केलं आणि पुन्हा आहे तिथूनच पुढे तेल टाकायला सुरू केली. स्क्रीन वरती 2900 तेल झाल्यानंतर टाकी फुल झाली. आधी पाचशेचे टाकल्यानंतर पुन्हा तेल टाकताना झिरो न करता आहे त्या 500 पासूनच तेल टाकले असताना सुद्धा आधीचे पाचशे व आत्ताचे 2900 असे मिळून तीन हजार चारशे रुपये त्या ग्राहकाकडे मागितले. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी संबधित ग्राहकाने मशिनवर 3400 रुपये देण्याची प्रक्रियाही सुरू केली.  मी स्वतः हा प्रकार त्या ग्राहकाच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर ते ग्राहकासोबत असणारी व्यक्तीही म्हणाली की आधी 500 होतं तिथून पुढेच तुम्ही कंटिन्यू केलेला आहे त्यामुळे तेल 2900 चेच झालं आहे. त्यानंतर संबंधित कर्मचारी महिलेने ठीक आहे 2900 द्या असे सांगितले. 

म्हणजेच ग्राहकाच्या हा प्रकार लक्षात आला म्हणून 2900 घेतले अन्यथा संबंधित महिला कर्मचारीने 3400 मागितलेले. त्या ग्राहकाने जर 3400 रुपयेच दिले असते तर पाचशे रुपयाची चोरी 100% होती. परंतु माझ्यासोबत आधी असाच प्रकार झाला असल्यामुळे मी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी संबंधित महिला कर्मचारी काय करते हे बघत उभा राहिलो आणि ही चूक ही चोरी त्या ग्राहकाच्या लक्षात आणून दिली.

 याही पुढे महत्वाचे म्हणजे हा प्रकार उघड होऊनही  संबधित महिला चूक मान्य करत नव्हती.तुम्ही यापूर्वीही असा प्रकार माझ्या मुलासोबत केला आहे असे सांगितले तर शक्यच नाही म्हणत माझ्याशी वाद घातला.शेवटी मी घरी येऊन माझ्या मुलाला त्या पंपावर घेऊन गेलो.20 जुलैला ज्यावेळेस असा प्रकार झाला त्यावेळेस तेथे उपस्थित असणाऱ्या अन्य एका कर्मचाऱ्यासोबत खरं खोटं पटवून दिलं त्यावेळेस असा प्रकार झाल्याचे संबंधित महिलेला आठवले.  

याबाबत संबंधित पेट्रोल पंपाच्या मॅनेजरना (संबंधित महीलेने मॅनेजरचा नंबर म्हणून जो नंबर दिला 7741022325 या नंबरवर ) दोन वेळा फोन करुनही त्यांनी फोन उचलला नाही. 

  पाचशे रुपये रक्कम कदाचित किरकोळ असेल पण हा प्रकार चुकीचा आहे म्हणून हा व्हिडीओ व पोस्ट केली.

      श्री विकास सूर्यवंशी 

सरचिटणीस,महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.