Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजीव गांधी यांचे देशासाठी मोठे योगदान-पृथ्वीराज पाटील

राजीव गांधी यांचे देशासाठी मोठे योगदान-पृथ्वीराज पाटील


सांगली, दि. २०: आधुनिक भारताचे शिल्पकार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन, सांगली येथे सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. श्री. पृथ्वीराज पाटील म्हणाले, माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि एकूणच गांधी परिवाराने देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे.  राजीव गांधी यांनी देशाला अत्यंत प्रगतीपथावर नेले. आधुनिक भारताचे शिल्पकार असेच त्यांना म्हणावे लागेल. त्यांचे योगदान विसरता येणार नाहीत.  महात्मा गांधींना बदनाम करण्याचा अजेंडाच भाजप राबवत आहे पण अशाने गांधींचे विचार संपणार नाहीत असेही ते म्हणाले.

यावेळी अरुण पडसुळे, पैगंबर शेख, अण्णासाहेब खोत, प्रशांत देशमुख, अल्ताफ पेंढारी, अशोक रासकर, विक्रम कांबळे, अरूण गवंडी, बाबगोंडा पाटील, सुरेश गायकवाड, श्रीधर बारटक्के, विश्वास यादव, नंदाताई कोलप, प्रतीक्षा काळे, कांचन खंदारे, नामदेव पठाडे, शैलेंद्र पिराळे, सिमा कुलकर्णी, शमशाद नायकवडी, कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.