Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सनी देओलच्या संपत्तीचा होणार लिलाव..

सनी देओलच्या संपत्तीचा होणार लिलाव..

बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र आता सनीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा खासदार असलेले अभिनेते सनी देओलला बँक ऑफ बडोदाने नोटीस बजावली पाठवण्यात आली आहे.

सनीने बँकेकडून मोठ्या रकमेचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार 56 कोटींच्या थकबाकीबाबत बँक ऑफ बडोदाने त्याला ही नोटीस पाठवली आहे. इतकच नाही तर बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या व्हिलाच्या लिलावासाठी जाहिरात काढली आहे. या कर्जाच्या जामीनदारामध्ये सनी देओलचे वडील आणि अभिनेता धर्मेंद्र यांचं नाव लिहिण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे. मिळालेल्या वृत्तानुसार सनी देओलने बँके कडून कर्ज घेतले मात्र त्याने त्याची परत फेड केलेली नाही. त्यामुळे त्याच्या मालमत्तेचा लिलाव होण्याची शक्तता आहे.


तर याबाबत बँकेकडून सांगण्यात आले की, सनीवर बँकेचे मोठे कर्ज आहे, ज्याच्या वसुलीसाठी बँकेने आता त्याच्या मुंबईतील मालमत्तेचा लिलाव करण्याची जाहिरात दिली आहे. जाहिरातीत म्हटल्यानुसार, सनी देओलच्या 'सनी व्हिला' या बंगल्याचा लिलाव 25 सप्टेंबरला होणार आहे. त्याच्या बंगल्याच्या लिलावासाठी 51.43 कोटी रुपये किंमत राखीव ठेवली असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे. मात्र याबाबत सनी देओलकडून काहीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

सनी देओलचा चित्रपट 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या गदर 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 'गदर 2'च्या कमाईचे आकडे पाहता हा सिनेमा बॉलिवूडमधील 'पठाण'लाही टक्कर देईल अशी चर्चा आहे. या चित्रपटाने आता पर्यंत एकूण 335 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या आणि लोकप्रिय अभिनेत्यावर करोडोंची थकबाकी असल्याचा आरोप झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता या प्रकरणी सनी काय पाऊल उचलणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.