लघवी तपासणीतून होऊ शकतं कर्करोगाचं निदान
गर्भधारणेच्या तपासणीसाठीचा एक सोपा उपाय म्हणून प्रेग्नन्सी किटकडे पाहिलं जातं. लघवीचे काही थेंब या किटमध्ये टाकून तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे लघवीच्या माध्यमातून कर्करोगाचं निदान होऊ शकतं, असा दावा करण्यात आला आहे.
अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी असा किट शोधून काढला आहे.
अमेरिकेतील काही शास्त्रज्ञांनी असा किट बनवला आहे, जो कर्करोगाची पेशी ओळखू शकेल. नॅनोपार्टिकल सेन्सर असं या संशोधनाचं नाव आहे. प्रेग्नन्सी किट प्रमाणेच या किटवर काही थेंब लघवी टाकल्यानंतर लघवीतील कर्करोगाची पेशी ओळखण्यासाठी या किटचा उपयोग होणार आहे. या किटद्वारे विविध प्रकारचे कर्करोग कळू शकणार आहेत. तसंच शरीरात विकसित होणारा ट्युमरही कळणार आहे. एखादी पेशी जेव्हा कर्करोगाची पेशी होते तेव्हा त्या पेशीतून डीएनएची एक साखळी बाहेर पडते आणि लघवीच्या मार्गाने त्याचं उत्सर्जन केलं जातं. तोच डीएनए ओळखणारा सेन्सर या किटमध्ये बसवण्यात आला आहे.
सध्या या किटवर अजून संशोधन सुरू आहे. मेसाच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. आता मानवावर याचा प्रयोग करण्यात येणार आहे. या किटमुळे अनेक प्रकारचे कर्करोग तपासण्यात येऊ शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
