Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विज्ञानाची कमाल, एकाच गर्भातून दोन सख्या बहिणी होणार आई

विज्ञानाची कमाल, एकाच गर्भातून दोन सख्या बहिणी होणार आई 


नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये ४० वर्षांच्या महिलेच्या पोटातून तिच्या ३४ वर्षीय बहिणीच्या पोटात गर्भ ट्रान्सप्लांट करण्यात आला. ही ब्रिटनमधील पहिली घटना आहे. हे ट्रान्सप्लांट यशस्वी झाले आहे.

दोन्ही महिला या इंग्लंडच्या राहणाऱ्या आहेत. जिच्या गर्भात गर्भ  होता ती दुर्धर आजाराने त्रस्त आहे. तिथं गर्भाशय पूर्णपणे विकसित होण्यासंदर्भात भीती होती. या ट्रान्सप्लांटसाठी सुमारे २६ लाख रुपयांचा खर्च आला. एका महिलेचे गर्भाशय काढून दुसऱ्या महिलेच्या पोटात कसे टाकले जाणून घ्या.

30 तज्ज्ञांची टीम, १७ तास सर्जरी

या ट्रान्सप्लांटसाठी १७ तास लागले. ३० तज्ज्ञांची टीमने यासाठी काम केले. सर्जरी करणारे डॉक्टर म्हणाले, संबंधित महिला दुर्धर आजाराने त्रस्त होती. गर्भाशय नसल्याने गर्भ पूर्णपणे विकसित झाला नसता. परंतु, ओवरी काम करत होती. महिला आणि तिचे पती हे फर्टीलीटी ट्रीटमेंट करत होते. ८ भृण स्टोअर करण्यात आले. ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी दोन्ही महिलांची काऊंसलिंग करण्यात आली. ह्यूमन टिश्यू अथॉरिटीची मंजुरी मिळाल्यानंतर ट्रान्सप्लांट करण्यात आले. सर्जरीचा खर्च वोंब ट्रान्सप्लांट युके नावाच्या ट्रस्टने केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.