Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तामिळनाडू ट्रेनला भीषण आग! १० ठार, २० जण जखमी

तामिळनाडू ट्रेनला भीषण आग! १० ठार, २० जण जखमी


तामिळनाडूच्या मदुराई येथे ट्रेनला भीषण आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. लखनऊ- रामेश्वर ट्रेनला ही आग लागली असून या घटनेत १० जण ठार झाले अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेनमधून गॅस सिंलेंडरची तस्करी केली जात असल्यामुळे आग लागल्याचे कारण सांगितले जात आहे. तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी हा अपघात झाला. लखनऊ-रामेश्वरम एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. आठही बळी उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. आग लागलेल्या डब्यात एकूण ५५ प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे.


दरम्यान पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसमध्ये आज पहाटे ५ : १५ वाजता मदुराई यार्ड येथे खाजगी डब्यात आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून अन्य डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. प्रवाशांना गॅस सिलिंडरची तस्करी केल्याचा आरोप आहे ज्यामुळे आग लागली दक्षिण रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे. पीटीआय य़ा वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या आगीच्या दुर्घटनेत ८ जण ठार, २० जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.